‘भाऊ, फ्लेक्स काढा!’ मोहिमेचे देवाभाऊंकडून कौतुक!

 
Pune Municipal Corporation Hoarding Campaign
 
पुणे (Pune Municipal Corporation Hoarding Campaign) : शहरातील अनधिकृत जाहिराती, फलक आणि होर्डिंग्जची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहे. या समस्येवर आळा घालण्यासाठी पुणे महानगरपालिकेने ‘भाऊ, फ्लेक्स काढा!’ ही अनोखी मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत नागरिकांनी केलेल्या तक्रारींची दखल घेऊन अनधिकृत फलक लावणाऱ्यांना पुरस्कार देण्याची अभिनव संकल्पना महापालिकेने राबवली आहे. महापालिकेच्या या उपक्रमाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दखल घेत पालिकेचे कौतुक केले आहे.
 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले , शहरातील पायाभूत सुविधांचा नागरिकांना योग्य पद्धतीने वापर करता आला पाहिजे. वाहनचालकांसाठी तसेच पादचाऱ्यांसाठी रस्त्यांवर पुरेशी जागा उपलब्ध असणे आवश्यक आहे. नियम केवळ सरकारी दस्तावेज किंवा शासन निर्णयांमध्ये प्रसिद्ध करण्यासाठी नसतात, तर त्यांचे प्रत्यक्ष पालनही झाले पाहिजे. सर्वसामान्य नागरिकांचे जीवन अधिक सुखकर व्हावे, हाच नियमांमागील मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. (Pune Municipal Corporation Hoarding Campaign)
 
बेकायदा होर्डिंगची समस्या देशभरात
 
बेकायदा होर्डिंग्जची समस्या केवळ पुण्यापुरती मर्यादित नसून देशभरातील अनेक शहरांमध्ये ती दिसून येते. त्यामुळे अशा होर्डिंग्जविरोधात सातत्याने आणि नियमितपणे कारवाई होणे आवश्यक असल्याचे फडणवीस यांनी नमूद केले. पुणे प्रशासनाने या मोहिमेसाठी स्वीकारलेल्या अभिनव संकल्पनेचे त्यांनी विशेष कौतुक केले. यावेळी त्यांनी मिश्किल टिप्पणीही केली. ‘उद्या माझ्या नावाचे बेकायदा होर्डिंग लागले, तर तुमच्या पुरस्कारांच्या यादीत माझेही नाव जाहीर करा,’ असे ते म्हणाले.
 
नागपूर प्रशासनालाही जनजागृतीचे आवाहन
 
येत्या काळात नागपूर येथे विधिमंडळाचे अधिवेशन होणार आहे. अधिवेशनाच्या काळात शहरात राजकीय नेते आणि कार्यकर्त्यांकडून मोठ्या प्रमाणात होर्डिंग्ज लावली जाण्याची शक्यता असते. त्यामुळे नागपूर प्रशासनाने आतापासूनच जनजागृती करावी. तसेच, अनधिकृत फलक आणि होर्डिंग्जमुळे शहराचे विद्रूपीकरण होणार नाही, याची खबरदारी घ्यावी, असे आवाहनही फडणवीस यांनी केले. (Pune Municipal Corporation Hoarding Campaign)




मुंबई तरुण भारत वेब टीम

Hello, You must be familiar with the Nation First approach daily 'Mumbai Tarun Bharat' as a newspaper committed to fearless and nationalist ideals and constantly doing conscious journalism for it. The journey of four decades has been successful only because of your trust and cooperation. Dear readers, we have been making a successful effort to always be perfect in our commitment to the thoughts of the nation and the national interest...
 
Changing with time is essential for any organization. Daily 'Mumbai Tarun Bharat' has decided to take this role here too and make 'MahaMTB' available in the media for the new 'smart' generation. Today's youth, readers, and citizens are becoming more and more 'smart' day by day. And in today's 'smart' era, information is available in abundance in the Internet-enabled information explosion. However, there is a need for complementary knowledge to determine a modern role and approach that is compatible with culture, motionlessness and tradition.
 
That is why mahamtb.com, MahaMTB Mobile App', MahaMTB Youtube Channel, MahaMTB Facebook Page, MahaMTB Twitter, MahaMTB Instagram, MahaMTB Telegram, MahaMTB WhatsApp Group etc. through social media and advanced avatar content. We are coming before you. Role in the new era, 'smart' journalism with a view, 'smart' multimedia for the new era, and journalism for a 'smart' Maharashtra will be the side of the game.
 
Now get all the updates in one click! mahamtb.com
संबंधित मजकूर