लोकसहभागातून जलसंधारणाची व्यापक चळवळ उभारणार! पानी फाऊंडेशनद्वारे आयोजित 'संपूर्ण महाराष्ट्र वॉटर कप २०२७’चा शुभारंभ!

 
Maharashtra Water Cup 2027
मुंबई (Maharashtra Water Cup 2027) : राज्यातील दुष्काळावर मात करण्यासाठी लोकसहभागातून जलसंधारणाची व्यापक चळवळ उभारण्याचा निर्धार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. पानी फाऊंडेशनच्या वतीने आयोजित ‘संपूर्ण महाराष्ट्र वॉटर कप २०२७’चा शुभारंभ आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वर्षा निवासस्थानी करण्यात आला. यावेळी अल निनोच्या पार्श्वभूमीवर आटलेल्या जलस्रोतांचे शास्त्रीय पद्धतीने पुनरुज्जीवन करण्यावर त्यांनी भर दिला.

आटलेल्या जलस्रोतांचे पुनरुज्जीवन करण्यावर भर

दुष्काळाशी सुरू असलेल्या लढ्यात सामुहीक संकल्प आणि लोकसहभागाच्या बळावर जलसंधारणाची व्यापक चळवळ उभारणे आवश्यक असल्याचे देवेंद्र फडणवीसांनी नमूद केले.अल निनोच्या प्रभावामुळे राज्यातील अनेक जलस्रोत आटले असले, तरी या परिस्थितीकडे केवळ संकट म्हणून न पाहता भविष्यातील जलसुरक्षेची संधी म्हणून पाहिले पाहिजे, असे मुख्यमंत्री म्हणाले. आटलेल्या जलस्रोतांचा शास्त्रीय दृष्टिकोनातून अभ्यास करून त्यांच्या परिसरात जलसंधारणाची कामे केल्यास जलस्रोतांचे पुनरुज्जीवन होण्यासह भूजलपातळी टिकवून ठेवण्यास मदत होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. (Maharashtra Water Cup 2027)

लोकचळवळीमुळे अनेक गावे आजही जलसमृद्ध
 
जलयुक्त शिवार आणि वॉटर कप स्पर्धेच्या माध्यमातून उभ्या राहिलेल्या लोकचळवळीमुळे अनेक गावांनी दुष्काळावर मात केली आहे. याच अनुभवाच्या आधारे ‘जलयुक्त शिवार ३.०’ आणि केंद्र सरकारच्या ‘व्हीबी-जी राम जी’ योजनेसह विविध शासकीय योजनांचे अभिसरण करून अधिकाधिक गावे जलसमृद्ध करण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. (Maharashtra Water Cup 2027)
 
राज्य सरकार, पानी फाऊंडेशन आणि ग्रामस्थांनी समन्वयाने काम करावे. कोणतेही गाव या अभियानातून मागे राहू नये, यासाठी सरकार आवश्यक योजना, संसाधने आणि पाठबळ उपलब्ध करून देईल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.

प्रभावी अंमलबजावणीसाठी उच्चाधिकार समिती
 
अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी राज्यस्तरीय उच्चाधिकार समिती स्थापन करण्यात आली आहे. विविध विभागांचे प्रमुख सचिव आणि पानी फाऊंडेशनच्या प्रतिनिधींचा समावेश असलेली उच्चस्तरीय समितीही अभियानाच्या प्रगतीवर लक्ष ठेवणार आहे. (Maharashtra Water Cup 2027)
 
जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी जिल्हा व तालुकास्तरावर समन्वय साधून कामांचा नियमित आढावा घ्यावा. कामांमधील अडचणी दूर करून ग्रामस्थांना प्रोत्साहित करावे, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.
 
पावसाळ्यापूर्वी जलसंधारणाची कामे पूर्ण करण्याचे निर्देश
 
पावसाळ्यापूर्वी जलसंधारणाची सर्व कामे पूर्ण करण्यासाठी गावांचे आणि पाणलोट क्षेत्रांचे सूक्ष्म नियोजन करण्याची सूचना फडणवीस यांनी केली. प्रशासकीय मान्यता, अंदाजपत्रके आणि इतर प्रक्रियांमध्ये विलंब होऊ नये. कोणतेही काम अर्धवट राहणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देशही त्यांनी दिले. (Maharashtra Water Cup 2027)
 
‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’ अभियानामुळे धरणे आणि जलस्रोतांची साठवण क्षमता वाढण्यासह शेतजमिनीची सुपीकता सुधारण्यास मदत झाली आहे. त्यामुळे अशा उपक्रमांचा समन्वय साधून जलसंधारणाची कामे अधिक व्यापक स्वरूपात राबविण्याची गरज असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

महाराष्ट्राच्या जलसंधारण मॉडेलची देशभरात ओळख
 
महाराष्ट्राने जलयुक्त शिवार आणि वॉटर कपच्या माध्यमातून उभारलेले जलसंधारणाचे मॉडेल देशभर पोहोचले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ‘मन की बात’मधून इतर राज्यांना महाराष्ट्राच्या जलसंधारण मॉडेलचा अभ्यास करण्याचे आवाहन केले होते. राजस्थान आणि तेलंगणासह विविध राज्यांतील अधिकाऱ्यांनी महाराष्ट्रात येऊन या उपक्रमांची माहिती घेतली आणि आपल्या राज्यांतही त्यांची अंमलबजावणी केली. (Maharashtra Water Cup 2027)
 
पूर्वानुभव आणि प्रशिक्षित मनुष्यबळाच्या जोरावर यंदा यापूर्वीपेक्षा अधिक प्रभावी काम करण्याची संधी असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.
 
नगरपंचायती आणि लहान नगरपरिषदांचाही समावेश करणार
 
वॉटर कप अभियानाची व्याप्ती वाढवून त्यात नगरपंचायती आणि लहान नगरपरिषदांचाही समावेश करण्याचा सरकारचा विचार आहे. या स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी स्वतंत्र निकष निश्चित करण्याबाबत नगरविकास विभागाशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल. नगरपंचायतींचे स्वरूप अद्याप अंशतः ग्रामीण असल्याने त्यांनाही जलसंधारणाच्या लोकचळवळीत सहभागी करून घेणे आवश्यक असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
 
या कार्यक्रमाला मंत्री संजय राठोड, पानी फाऊंडेशनचे संस्थापक आमिर खान, मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित भटकळ, विविध जिल्ह्यांतील वरिष्ठ अधिकारी आणि इतर मान्यवर उपस्थित होते. (Maharashtra Water Cup 2027)
 
 




मुंबई तरुण भारत वेब टीम

Hello, You must be familiar with the Nation First approach daily 'Mumbai Tarun Bharat' as a newspaper committed to fearless and nationalist ideals and constantly doing conscious journalism for it. The journey of four decades has been successful only because of your trust and cooperation. Dear readers, we have been making a successful effort to always be perfect in our commitment to the thoughts of the nation and the national interest...
 
Changing with time is essential for any organization. Daily 'Mumbai Tarun Bharat' has decided to take this role here too and make 'MahaMTB' available in the media for the new 'smart' generation. Today's youth, readers, and citizens are becoming more and more 'smart' day by day. And in today's 'smart' era, information is available in abundance in the Internet-enabled information explosion. However, there is a need for complementary knowledge to determine a modern role and approach that is compatible with culture, motionlessness and tradition.
 
That is why mahamtb.com, MahaMTB Mobile App', MahaMTB Youtube Channel, MahaMTB Facebook Page, MahaMTB Twitter, MahaMTB Instagram, MahaMTB Telegram, MahaMTB WhatsApp Group etc. through social media and advanced avatar content. We are coming before you. Role in the new era, 'smart' journalism with a view, 'smart' multimedia for the new era, and journalism for a 'smart' Maharashtra will be the side of the game.
 
Now get all the updates in one click! mahamtb.com
संबंधित मजकूर