पुणे न्यायालयाबाहेर भरदिवसा तरुणावर जीवघेणा हल्ला! कोयत्याचे वार; घटनास्थळी दोन पिस्तूल जप्त!


 Pune Court Attack

 पुणे (Pune Court Attack) : पुण्यातील शिवाजीनगर न्यायालयाच्या बाहेर बुधवार, दि. २५ नोव्हेंबर रोजी  दुपारी एका तरुणावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. मंदार किवडे असे हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. चार हल्लेखोरांनी त्याच्यावर गोळीबार केला त्यानंतर त्याच्यावर धारदार शस्त्रांनी वार केले. घटनास्थळावर दोन पिस्तूलही आढळून आले आहेत. या घटनेमुळे न्यायालय परिसरात एकच खळबळ उडाली असून, शहरातील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
 
न्यायालयाच्या गेट क्रमांक चारजवळ हल्ला
 
मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी दुपारी सव्वा एकच्या सुमारास शिवाजीनगर न्यायालयाच्या गेट क्रमांक चारजवळ मंदार किवडे याच्यावर हल्ला करण्यात आला. सुमारे तीन ते चार हल्लेखोरांनी त्याचा पाठलाग करून त्याला गाठले आणि धारदार शस्त्रांनी वार केले. हल्ल्यानंतर आरोपी दुचाकींवरून घटनास्थळावरून पसार झाले. जखमी किवडे याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत. (Pune Court Attack)





पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, संशयितांची ओळख पटविण्याचे काम सुरू असून, पंचनामा करण्याचं काम सुरू आहे. घटनास्थळावरून दोन पिस्तूल जप्त करण्यात आले आहेत. हल्लेखोरांच्या अटकेसाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहेत. या हल्ल्यात गोळीबार झाला का, याबाबत अद्याप स्पष्टता नाही. डॉक्टरांच्या प्राथमिक तपासणीत गोळी लागल्याची जखम आढळलेली नसल्याचे सांगण्यात आले आहे.
 
जुन्या वैमनस्यातून हल्ला झाल्याचा संशय; कोण आहे मंदार किवडे?
 
मंदार मारुती किवडे २० एप्रिल २०२५ रोजी पुण्यातील कात्रज परिसरातील संतोषनगर येथे झालेल्या शुभम सुभाष चव्हाण हत्या प्रकरणातील आरोपी आहे. जमीन आणि आर्थिक वादातून शुभम चव्हाण याची हत्या झाल्याची माहिती आहे. या प्रकरणात किवडे याला अटक करण्यात आली होती. चार दिवसांपूर्वीच तो जामिनावर तुरुंगातून बाहेर आला होता. त्यानंतर न्यायालयीन कामकाजासाठी आला असताना त्याच्यावर हा हल्ला करण्यात आला. त्यामुळे जुन्या वैमनस्यातून हा प्रकार घडल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. (Pune Court Attack)
 
प्रत्यक्षदर्शींनी सांगितला हल्ल्याचा थरार
 
या घटनेचे प्रत्यक्षदर्शी असलेल्या एका वकिलाने सांगितले की, तीन ते चार जण एका व्यक्तीचा पाठलाग करत होते. न्यायालय परिसरात अशा प्रकारची घटना घडणे ही नागरिकांच्या आणि वकिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत गंभीर बाब आहे.
 
दुसरे प्रत्यक्षदर्शी वकील प्रदीप तांबे यांनी सांगितले की, हल्लेखोरांनी एका व्यक्तीवर अनेक वार केले आणि त्यानंतर दुचाकीवरून पळ काढला. हल्ल्यादरम्यान अरोपी त्यांच्या गाडीला धडकला. ही घटना न्यायालयाच्या बाहेर रस्त्यावर, गेट क्रमांक चारजवळ घडली. वार झाल्यानंतर जखमी व्यक्ती स्वतः उठून दुसऱ्या ठिकाणी गेली. त्यानंतर पोलिसांनी त्याला रिक्षातून रुग्णालयात नेले. पुण्यात वाढणाऱ्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी अधिक खबरदारी घ्यावी, अशी मागणीही त्यांनी केली. (Pune Court Attack)

न्यायालय परिसरातील वकिलांची सुरक्षा रामभरोसे?
 
या घटनेनंतर वकिलांच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे. अ‍ॅड. संतोष शिंदे यांनी या घटनेवर तीव्र नाराजी व्यक्त केली. न्यायालयात वकील सुरक्षित नाहीत आणि न्यायालयाबाहेर सामान्य नागरिकही सुरक्षित नाहीत, अशी टीका त्यांनी केली. न्यायालय परिसरात धमकीचे ई-मेल, बॉम्बच्या अफवा आणि आता भरदिवसा शस्त्रांनी हल्ला अशा घटना घडत असल्याने सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनल्याचे ते म्हणाले.
 
न्यायालयाच्या परिसरात पुरेशी सुरक्षा व्यवस्था आणि आधुनिक तपासणी यंत्रणा असणे आवश्यक आहे. वकिलांना संरक्षण मिळण्यासाठी वकील सुरक्षा कायदा तातडीने लागू करावा, अशी मागणीही अ‍ॅड. शिंदे यांनी केली. पोलिसांनी अशा घटनांना आळा घालण्यासाठी अधिक सतर्क राहण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. (Pune Court Attack)
 
सुप्रिया सुळेंकडून पुण्यातील कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह
 
या घटनेवर बारामतीच्या खासदार आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत पुण्याची ओळख गुन्हेगारी आणि दहशतीचे शहर म्हणून होत चालल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. (Pune Court Attack)
 
न्यायालय हे सर्वसामान्य नागरिकांसाठी न्यायाचे मंदिर आहे. अशा संवेदनशील ठिकाणी भरदिवसा शस्त्रांनी हल्ला होत असेल, तर नागरिकांनी सुरक्षिततेसाठी कोणाकडे पाहायचे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. न्यायालय परिसरात पोलीस चौकी आणि सुरक्षा बंदोबस्त असतानाही हल्लेखोर शस्त्रे घेऊन येतातच कसे, असा प्रश्नही त्यांनी विचारला.
 
पुण्यात कोयता गँगची दहशत, गोळीबार, भररस्त्यातील हत्या आणि महिलांवरील अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचा आरोप करत सुळे यांनी पोलीस प्रशासन आणि गृहखात्याच्या कामकाजावर टीका केली. या प्रकरणातील सर्व आरोपींना तातडीने अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, तसेच शहरातील कायदा-सुव्यवस्था सुधारण्यासाठी ठोस पावले उचलावीत, अशी मागणी त्यांनी केली. (Pune Court Attack)






मुंबई तरुण भारत वेब टीम

Hello, You must be familiar with the Nation First approach daily 'Mumbai Tarun Bharat' as a newspaper committed to fearless and nationalist ideals and constantly doing conscious journalism for it. The journey of four decades has been successful only because of your trust and cooperation. Dear readers, we have been making a successful effort to always be perfect in our commitment to the thoughts of the nation and the national interest...
 
Changing with time is essential for any organization. Daily 'Mumbai Tarun Bharat' has decided to take this role here too and make 'MahaMTB' available in the media for the new 'smart' generation. Today's youth, readers, and citizens are becoming more and more 'smart' day by day. And in today's 'smart' era, information is available in abundance in the Internet-enabled information explosion. However, there is a need for complementary knowledge to determine a modern role and approach that is compatible with culture, motionlessness and tradition.
 
That is why mahamtb.com, MahaMTB Mobile App', MahaMTB Youtube Channel, MahaMTB Facebook Page, MahaMTB Twitter, MahaMTB Instagram, MahaMTB Telegram, MahaMTB WhatsApp Group etc. through social media and advanced avatar content. We are coming before you. Role in the new era, 'smart' journalism with a view, 'smart' multimedia for the new era, and journalism for a 'smart' Maharashtra will be the side of the game.
 
Now get all the updates in one click! mahamtb.com
संबंधित मजकूर