मुंबई (Mumbai Airport Mosque Controversy) : छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल-२ जवळील एका मशिदीच्या बांधकामावरून मुंबईत नवा वाद निर्माण झाला आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (MMRDA) संबंधित बांधकाम अनधिकृत ठरवत ते हटविण्याचे निर्देश मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेडला (MIAL) दिले असून, तसे न केल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही दिला आहे.
यासंदर्भातील नोटीस मशिदीच्या प्रवेशद्वारावर लावण्यात आली आहे. या कारवाईवर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी समाधान व्यक्त केले असून, एमआयएमचे नेते वारिस पठाण यांनी या निर्णयावर आक्षेप घेतला आहे. (Mumbai Airport Mosque Controversy)
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी गेल्या काही काळापासून विमानतळ परिसरातील या बांधकामाचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यांच्या आरोपानुसार, विमानतळाजवळील सुमारे पाच हजार चौरस फूट सरकारी जागेवर कोणतीही परवानगी न घेता मशिदीचे बांधकाम करण्यात आले आहे. हा परिसर सुरक्षेच्या दृष्टीने संवेदनशील असल्याने तेथे अशा प्रकारचे बांधकाम असणे धोकादायक असल्याचा दावाही त्यांनी केला होता. संबंधित बांधकाम हटवण्यासोबतच त्यासाठी जबाबदार असलेल्यांविरोधात एफआयआर दाखल करण्याची मागणीही त्यांनी केली होती. त्यांच्या मते, २०१४ पूर्वी या ठिकाणी कोणतेही बांधकाम नव्हते. त्यानंतर टिनशेडचे बांधकाम उभारून जागेवर अतिक्रमण करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
MMRDAचे MIALला कारवाईचे निर्देश
मुंबई विमानतळाच्या टर्मिनल-२ जवळील व्हीआयपी आगमन प्रवेशद्वार आणि टॅक्सी पार्किंग परिसरात हे बांधकाम आहे. MMRDAच्या आदेशानुसार, ‘अशबुल जन्नत एअरपोर्ट चॅरिटेबल ट्रस्ट’ने बांधकामाच्या समर्थनार्थ सादर केलेली कागदपत्रे पुरेशी नसल्याचे प्राधिकरणाने नमूद केले आहे. संबंधित अधिसूचित क्षेत्रात सार्वजनिक प्रार्थनास्थळासाठी कोणतीही जागा आरक्षित किंवा निश्चित करण्यात आलेली नसल्याचेही प्राधिकरणाने स्पष्ट केले आहे. (Mumbai Airport Mosque Controversy)
या परिसरातील पायाभूत सुविधांचे नियोजन, विकास आणि देखभालीची जबाबदारी MIALची असल्याने संबंधित बांधकाम हटवण्याची कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच, केलेल्या कारवाईचा अहवाल संबंधित प्रशासनाला सादर करण्यास सांगण्यात आले आहे. MIALने निर्देशांचे पालन न केल्यास त्यांच्याविरोधातही नियमानुसार कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते.
‘आठवडाभरात कारवाई होणार’; किरीट सोमय्यांचा दावा
MMRDAच्या आदेशानंतर किरीट सोमय्या यांनी संबंधित बांधकाम एका आठवड्यात हटवले जाईल, असा दावा केला आहे. तसेच, बांधकामासाठी जबाबदार असलेल्या व्यक्तींविरोधात एफआयआर दाखल करण्याची मागणीही त्यांनी पुन्हा केली आहे. (Mumbai Airport Mosque Controversy)
‘बांधकामासाठी परवानगी घेतली होती’; ट्रस्टची भूमिका
दुसरीकडे, मशिदीच्या व्यवस्थापनाशी संबंधित ट्रस्टने सोमय्या यांचे आरोप फेटाळले आहेत. बांधकामासाठी आवश्यक परवानगी घेतली होती आणि त्यावेळी GVK तसेच विमानतळ प्रशासनाला याची माहिती होती, असा दावा ट्रस्टकडून करण्यात आला आहे. यासंदर्भात २०१५ मधील एका पत्राचाही दाखला देण्यात आला असून, त्यामध्ये प्रार्थनास्थळाचा उल्लेख असल्याचे ट्रस्टचे म्हणणे आहे. (Mumbai Airport Mosque Controversy)
वारिस पठाण यांचा कारवाईला विरोध
एमआयएमचे नेते वारिस पठाण यांनीही या कारवाईवर आक्षेप घेतला आहे. त्यांनी किरीट सोमय्या यांच्या आंदोलनावर टीका करत त्यांच्याविरोधातच एफआयआर दाखल करण्याची मागणी केली आहे. तसेच, मशिदीशी संबंधित प्रकरण न्यायालयात प्रलंबित असल्याचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला आहे.
दरम्यान, MMRDAच्या निर्देशांनंतर पुढील कारवाईची जबाबदारी MIALवर आहे. सध्या संबंधित ठिकाणी नोटीस लावण्यात आली असून, प्रत्यक्ष तोडकाम झाल्याचे वृत्त नाही. या प्रकरणावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. भाजपकडून अनधिकृत बांधकामावरील कारवाईचे समर्थन केले जात असताना, विरोधकांकडून विशिष्ट समुदायाला लक्ष्य केले जात असल्याचा आरोप केला जात आहे. प्रशासनाकडून मात्र नियमांचे उल्लंघन झालेल्या कोणत्याही बांधकामावर कायद्यानुसार कारवाई केली जाईल, अशी भूमिका मांडली जात आहे. (Mumbai Airport Mosque Controversy)
Hello, You must be familiar with the Nation First approach daily 'Mumbai Tarun Bharat' as a newspaper committed to fearless and nationalist ideals and constantly doing conscious journalism for it. The journey of four decades has been successful only because of your trust and cooperation. Dear readers, we have been making a successful effort to always be perfect in our commitment to the thoughts of the nation and the national interest...
Changing with time is essential for any organization. Daily 'Mumbai Tarun Bharat' has decided to take this role here too and make 'MahaMTB' available in the media for the new 'smart' generation. Today's youth, readers, and citizens are becoming more and more 'smart' day by day. And in today's 'smart' era, information is available in abundance in the Internet-enabled information explosion. However, there is a need for complementary knowledge to determine a modern role and approach that is compatible with culture, motionlessness and tradition.
That is why mahamtb.com, MahaMTB Mobile App', MahaMTB Youtube Channel, MahaMTB Facebook Page, MahaMTB Twitter, MahaMTB Instagram, MahaMTB Telegram, MahaMTB WhatsApp Group etc. through social media and advanced avatar content. We are coming before you. Role in the new era, 'smart' journalism with a view, 'smart' multimedia for the new era, and journalism for a 'smart' Maharashtra will be the side of the game.