२६/११ च्या शहीदांना आदरांजली अन् मानवतेच्या सेवकांचा गौरव! ‘ग्लोबल पीस ऑनर्स २०२६’ सोहळ्यात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते मान्यवरांचा सन्मान!

 
Global Peace Honours 2026
 
मुंबई (Global Peace Honours 2026) : मानवता, सेवा आणि समर्पणाच्या माध्यमातून समाजात सकारात्मक बदल घडविणाऱ्या व्यक्तींच्या कार्याचा गौरव करण्यासाठी मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया येथे ‘ग्लोबल पीस ऑनर्स २०२६’ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. दिव्यज फाउंडेशनच्या वतीने आयोजित या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या मान्यवरांना ‘ग्लोबल पीस ऑनर्स’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
 
२६/११ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यातील शहीदांना आदरांजली अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. शहीदांना वंदन करण्यासाठी अशा कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिव्यज फाउंडेशनचे अभिनंदन केले. तसेच, शिक्षण, आरोग्य, महिला सक्षमीकरण, स्वच्छता आणि समाजकल्याण या क्षेत्रांत फाउंडेशनकडून सातत्याने उल्लेखनीय कार्य केले जात असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांची नमूद केले. (Global Peace Honours 2026)
 
‘शांतता हा प्रगती आणि समृद्धीचा भक्कम आधार’
 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, शांतता हा प्रगती आणि समृद्धीचा भक्कम आधार आहे. ज्या समाजात शांतता असते, तिथेच विश्वास, विकास आणि व्यापकता नांदते. शांतता टिकवून ठेवण्यासाठी सरकारसोबतच समाजाचाही सहभाग महत्त्वाचा आहे. (Global Peace Honours 2026)
 
‘ग्लोबल पीस ऑनर्स’च्या माध्यमातून समाजातील विविध क्षेत्रांत निःस्वार्थपणे योगदान देणाऱ्या व्यक्तींचा सन्मान केला जातो. अशा पुरस्कारांच्या माध्यमातून जीवनात सकारात्मक बदल घडविणाऱ्या व्यक्तींच्या कार्याचा गौरव होतोच, शिवाय त्यांच्या कार्यातून इतरांनाही प्रेरणा मिळते. त्यामुळे सर्वांनी एकत्र येऊन शांतता, सहकार्य आणि मानवतेची मूल्ये अधिक भक्कम करत विकसित भारताच्या स्वप्नपूर्तीसाठी योगदान द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले. (Global Peace Honours 2026)
 
सचिन तेंडुलकर, सद्गुरूंसह अनेक मान्यवरांचा गौरव
 
या सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्योगपती बी. प्रभाकरन, पद्मविभूषण सद्गुरू, भारतरत्न सचिन तेंडुलकर आणि २६/११ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यातील प्रत्यक्षदर्शी देविका रोटावन यांना ‘ग्लोबल पीस ऑनर्स’ पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी पद्मविभूषण सद्गुरू यांच्याशी विविध विषयांवर संवादही साधला. (Global Peace Honours 2026)
 
या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री पीयूष गोयल, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, पद्मविभूषण सद्गुरू, अमृता फडणवीस यांच्यासह राज्य सरकारमधील मंत्री उपस्थित होते. तसेच, २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यातील हुतात्म्यांचे कुटुंबीय, विविध देशांचे महावाणिज्यदूत आणि राजदूत, उद्योजक, अभिनेते व कलाकारांनीही कार्यक्रमाला उपस्थिती लावली. (Global Peace Honours 2026)




मुंबई तरुण भारत वेब टीम

Hello, You must be familiar with the Nation First approach daily 'Mumbai Tarun Bharat' as a newspaper committed to fearless and nationalist ideals and constantly doing conscious journalism for it. The journey of four decades has been successful only because of your trust and cooperation. Dear readers, we have been making a successful effort to always be perfect in our commitment to the thoughts of the nation and the national interest...
 
Changing with time is essential for any organization. Daily 'Mumbai Tarun Bharat' has decided to take this role here too and make 'MahaMTB' available in the media for the new 'smart' generation. Today's youth, readers, and citizens are becoming more and more 'smart' day by day. And in today's 'smart' era, information is available in abundance in the Internet-enabled information explosion. However, there is a need for complementary knowledge to determine a modern role and approach that is compatible with culture, motionlessness and tradition.
 
That is why mahamtb.com, MahaMTB Mobile App', MahaMTB Youtube Channel, MahaMTB Facebook Page, MahaMTB Twitter, MahaMTB Instagram, MahaMTB Telegram, MahaMTB WhatsApp Group etc. through social media and advanced avatar content. We are coming before you. Role in the new era, 'smart' journalism with a view, 'smart' multimedia for the new era, and journalism for a 'smart' Maharashtra will be the side of the game.
 
Now get all the updates in one click! mahamtb.com
संबंधित मजकूर