अभिनेता इम्रान खान यांची मुंबई उच्च न्यायालयात माफी! यापुढे कोणत्याही आंदोलनात सहभागी होणार नसल्याचे आश्वासन!

 
Imran Khan Bombay High Court Apology
 
मुंबई (Imran Khan Bombay High Court Apology) : मुंबईत दि. १० ऑक्टोबर रोजी झालेल्या एसआयआर विरोधातील आंदोलनात सहभागी झाल्याप्रकरणी अभिनेता इमरान खान यांनी मुंबई उच्च न्यायालयात बिनशर्त माफी मागितली आहे. यापुढे अशा कोणत्याही आंदोलनात सहभागी होणार नसल्याचे आश्वासनही त्यांनी न्यायालयाला दिले आहे. इमरान खान यांना बजावण्यात आलेल्या ‘लीव्ह इंडिया नोटीस’ (LIN) विरोधात दाखल याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने त्यांना बिनशर्त माफी आणि लेखी हमीपत्र सादर करण्याचे निर्देश दिले होते.
 
‘लीव्ह इंडिया नोटीस’ला आव्हान
 
इमरान खान यांच्या याचिकेवर सुनावणीदरम्यान मुंबई उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला ‘वसुधैव कुटुंबकम्’ या तत्त्वाची आठवण करून दिली. तसेच, इमरान खान यांना त्यांच्याविरोधात जारी करण्यात आलेल्या ‘लीव्ह इंडिया नोटीस’ला उत्तर देण्यासाठी काही वेळ देण्याचे निर्देश दिले. (Imran Khan Bombay High Court Apology)
 
न्यायालयाने पुढील सुनावणी ७ डिसेंबर रोजी ठेवली आहे. तोपर्यंत इमरान खान यांच्याविरोधातील ‘लीव्ह इंडिया नोटीस’ला स्थगिती राहणार आहे.
 
न्यायालयाच्या सुनावणीतील महत्त्वाचे मुद्दे
 
सुनावणीदरम्यान न्यायालयाने इमरान खान यांच्या भारतातील वास्तव्याचा आणि आंदोलनातील सहभागाचा संदर्भ देत काही प्रश्न उपस्थित केल्याचे वृत्त आहे. त्यातील महत्त्वाचे मुद्दे पुढीलप्रमाणे आहेत. (Imran Khan Bombay High Court Apology)
 
१. परदेशातील भारतीय नागरिकाच्या वर्तनाचा संदर्भ
 
भारतीय नागरिकाने परदेशात अशाच प्रकारचे कृत्य केले असते, तर त्याला पुढील विमानाने भारतात परत पाठवले गेले असते, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवल्याचे वृत्त आहे. (Imran Khan Bombay High Court Apology)
 
२. यापूर्वी आंदोलनात सहभागी का झाले नाहीत?
 
इमरान खान अनेक वर्षांपासून भारतात राहत असून, यापूर्वी त्यांनी कोणत्याही आंदोलनात सहभाग घेतला नव्हता. मग आता एसआयआर विरोधातील आंदोलनात सहभागी होण्याचे कारण काय, असा प्रश्न न्यायालयाने उपस्थित केल्याचे सांगितले जाते. (Imran Khan Bombay High Court Apology)
 
३. OCI दर्जाचा मुद्दा
 
इमरान खान हे भारतीय नागरिक नसून OCI कार्डधारक आहेत. त्यामुळे भारतीय नागरिकांप्रमाणे वर्तन करता येणार नाही आणि एसआयआर प्रक्रियेचा त्यांचा काहीही संबंध नसल्याने त्यांना या मुद्यावर आंदोलन करण्याचा हक्क नसल्याचे न्यायालयाने म्हटले आहे.
 
४. भारतीय नागरिकत्वासाठी अर्ज का केला नाही?
 
इमरान खान लहानपणापासून भारतात राहत असतील, तर त्यांनी भारतीय नागरिकत्वासाठी अर्ज का केला नाही, असा सवाल न्यायालयाने उपस्थित केल्याचे सांगितले जाते. OCI दर्जा कायम ठेवायचा असल्यास भविष्यात अशा आंदोलनांमध्ये सहभागी न होण्याचे लेखी आश्वासन द्यावे लागेल, असेही न्यायालयाने म्हटल्याचे वृत्त आहे. (Imran Khan Bombay High Court Apology)
 
५. बिनशर्त माफी आणि लेखी हमीची मागणी
 
आंदोलनातील सहभागामुळे लोकांना चिथावणी मिळाल्याचे निरीक्षण नोंदवत न्यायालयाने इमरान खान यांना बिनशर्त माफी मागण्यास सांगितल्याचे वृत्त आहे. सेलिब्रिटींकडून अशा वर्तनाची अपेक्षा नसल्याचे आणि त्यांची उपजीविका भारताशी संबंधित असल्याचेही न्यायालयाने म्हटल्याचे सांगितले जाते. (Imran Khan Bombay High Court Apology)
 
पुढील सुनावणीकडे लक्ष
 
इमरान खान यांनी बिनशर्त माफी मागून भविष्यात अशा आंदोलनांमध्ये सहभागी न होण्याचे आश्वासन दिले आहे. आता ७ डिसेंबर रोजी होणाऱ्या पुढील सुनावणीत न्यायालय काय भूमिका घेते, याकडे लक्ष लागले आहे. तोपर्यंत त्यांच्या विरोधातील ‘लीव्ह इंडिया नोटीस’ला स्थगिती कायम राहणार आहे. (Imran Khan Bombay High Court Apology)





मुंबई तरुण भारत वेब टीम

Hello, You must be familiar with the Nation First approach daily 'Mumbai Tarun Bharat' as a newspaper committed to fearless and nationalist ideals and constantly doing conscious journalism for it. The journey of four decades has been successful only because of your trust and cooperation. Dear readers, we have been making a successful effort to always be perfect in our commitment to the thoughts of the nation and the national interest...
 
Changing with time is essential for any organization. Daily 'Mumbai Tarun Bharat' has decided to take this role here too and make 'MahaMTB' available in the media for the new 'smart' generation. Today's youth, readers, and citizens are becoming more and more 'smart' day by day. And in today's 'smart' era, information is available in abundance in the Internet-enabled information explosion. However, there is a need for complementary knowledge to determine a modern role and approach that is compatible with culture, motionlessness and tradition.
 
That is why mahamtb.com, MahaMTB Mobile App', MahaMTB Youtube Channel, MahaMTB Facebook Page, MahaMTB Twitter, MahaMTB Instagram, MahaMTB Telegram, MahaMTB WhatsApp Group etc. through social media and advanced avatar content. We are coming before you. Role in the new era, 'smart' journalism with a view, 'smart' multimedia for the new era, and journalism for a 'smart' Maharashtra will be the side of the game.
 
Now get all the updates in one click! mahamtb.com
संबंधित मजकूर