नाशिक (Nashik Simhastha Kumbh Mela 2026-28) : गोदावरीचा पवित्र तीर, आखाड्यांच्या परंपरा, बारा वर्षांची प्रतीक्षा आणि साधू-महंतांच्या उपस्थितीत रंगणारा आध्यात्मिक सोहळा नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याला ऐतिहासिक, धार्मिक आणि पौराणिक महत्त्व लाभले आहे. मात्र २०२७ मध्ये होणारा सिंहस्थ केवळ धार्मिक सोहळ्यापुरता मर्यादित राहणार नसून आधुनिक तंत्रज्ञान, भव्य पायाभूत सुविधा, पर्यावरण संवर्धन आणि दीर्घकालीन शहरी विकासाचा नवा अध्याय लिहिण्याच्या तयारीत आहे. २००३-०४ आणि २०१५-१६ च्या कुंभमेळ्यांच्या तुलनेत यंदाच्या सिंहस्थाचे सर्वांत मोठे वेगळेपण म्हणजे कुंभमेळ्यासाठी उभारण्यात येणाऱ्या सुविधांचा लाभ पुढील अनेक वर्षे नाशिककरांनाही मिळावा, या दृष्टिकोनातून आखलेले नियोजन होय.
नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थाचे धार्मिक वैशिष्ट्य आजही तितकेच महत्त्वाचे आहे. देशातील इतर कुंभक्षेत्रांपेक्षा येथे वैष्णव आणि शैव आखाड्यांचे अमृतस्नान स्वतंत्र तीर्थक्षेत्रांवर होते. नाशिकमध्ये रामकुंडावर वैष्णव आखाडे, तर त्र्यंबकेश्वरच्या कुशावर्त तीर्थावर शैव आखाड्यांचे धार्मिक विधी पार पडतात. ही स्वतंत्र स्नानपरंपरा नाशिकच्या सिंहस्थाची वेगळी ओळख आहे. (Nashik Simhastha Kumbh Mela 2026-28)
कुंभ प्राधिकरणाच्या आयुक्तांनी ऑगस्टमध्ये जाहीर केल्यानुसार या सिंहस्थाच्या आर्थिक नियोजनाचा आवाका ३४ हजार ७३२ कोटी रुपयांचा असून, त्यातील सुमारे ८५ टक्के निधी कायमस्वरूपी पायाभूत सुविधांवर खर्च करण्याचे नियोजन आहे. रिंगरोड, विस्तारित रस्ते, घाटांचे नूतनीकरण, रेल्वे स्थानकांचा विकास आणि साधुग्रामची उभारणी यामुळे कुंभमेळ्याच्या व्यवस्थापनाला नवे स्वरूप मिळणार असून गर्दी नियंत्रणासाठी एकात्मिक नियंत्रण केंद्र, डिजिटल पोर्टल, मोबाइल ॲप आणि आधुनिक सुरक्षा यंत्रणांचा वापर करण्याचे नियोजनही करण्यात आले आहे, पर्यावरणाच्या दृष्टीने गोदावरी स्वच्छता, सांडपाणी प्रक्रिया आणि पाण्याच्या पुनर्वापरावर भर दिला जात आहे. त्याचबरोबर त्र्यंबकेश्वर मंदिर, कुशावर्त तीर्थ, पांडवलेणी आणि अन्य ऐतिहासिक वास्तूंच्या संवर्धनाचे कामही हाती घेण्यात आले आहे. (Nashik Simhastha Kumbh Mela 2026-28)
२०२७ च्या सिंहस्थात सुमारे १२ कोटी भाविक येण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला असून त्यामुळे गर्दी व्यवस्थापन, आरोग्यसेवा, वाहतूक आणि सुरक्षा ही प्रशासनासमोरील मोठी आव्हाने असतील. धार्मिक परंपरेची अखंडता जपत आधुनिक विकासाचा पाया रचण्याचा प्रयत्न म्हणजे २०२७ च्या सिंहस्थाचे खरे वेगळेपण. कुंभमेळा संपल्यानंतरही रस्ते, घाट, पाणीपुरवठा, स्वच्छता आणि वाहतूक सुविधांच्या माध्यमातून नाशिकच्या विकासाला मिळणारी कायमस्वरूपी दिशा हेच या सिंहस्थाचे दीर्घकालीन फलित ठरणार आहे.
७१ वर्षांनंतर दुर्मीळ त्रिखंडी योग
यंदाच्या सिंहस्थाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे तब्बल ७१ वर्षांनंतर जुळून येत असलेला दुर्मीळ त्रिखंडी योग. ज्योतिषीय अभ्यासकांच्या मते, यापूर्वी १९५६ मध्ये अशा प्रकारचा योग जुळून आला होता. त्यामुळे धार्मिक परंपरेसोबतच दुर्मीळ खगोलीय गणनेमुळेही यंदाचा सिंहस्थ विशेष महत्त्व प्राप्त करणारा ठरत आहे. गुरू ग्रहाच्या वक्री आणि मार्गी भ्रमणामुळे सिंहस्थ पर्व तीन स्वतंत्र कालखंडांत विभागले जाणार आहे. (Nashik Simhastha Kumbh Mela 2026-28)
सिंहस्थाचे तीन कालखंड
ध्वजारोहण - ३१ ऑक्टोबर २०२६
पहिला टप्पा - ऑक्टोबर २०२६ ते जानेवारी २०२७
दुसरा टप्पा - जून ते नोव्हेंबर २०२७
तिसरा टप्पा - फेब्रुवारी ते जुलै २०२८
ध्वजावतरण - २४ जुलै २०२८
सिंहस्थाचे आर्थिक नियोजन
१) २२,४२५ कोटी रुपये –राज्य सरकारकडून मंजूर विकास आराखडा
३) ३४,७३२ कोटी रुपये – कुंभ प्राधिकरण आयुक्तांचा आराखडा
Hello, You must be familiar with the Nation First approach daily 'Mumbai Tarun Bharat' as a newspaper committed to fearless and nationalist ideals and constantly doing conscious journalism for it. The journey of four decades has been successful only because of your trust and cooperation. Dear readers, we have been making a successful effort to always be perfect in our commitment to the thoughts of the nation and the national interest...
Changing with time is essential for any organization. Daily 'Mumbai Tarun Bharat' has decided to take this role here too and make 'MahaMTB' available in the media for the new 'smart' generation. Today's youth, readers, and citizens are becoming more and more 'smart' day by day. And in today's 'smart' era, information is available in abundance in the Internet-enabled information explosion. However, there is a need for complementary knowledge to determine a modern role and approach that is compatible with culture, motionlessness and tradition.
That is why mahamtb.com, MahaMTB Mobile App', MahaMTB Youtube Channel, MahaMTB Facebook Page, MahaMTB Twitter, MahaMTB Instagram, MahaMTB Telegram, MahaMTB WhatsApp Group etc. through social media and advanced avatar content. We are coming before you. Role in the new era, 'smart' journalism with a view, 'smart' multimedia for the new era, and journalism for a 'smart' Maharashtra will be the side of the game.