‘महाराष्ट्राच्या हास्यरेषा’ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसमोर उद्धव ठाकरेंनी सांगितला तो 'किस्सा'

 
Maharashtrachya Hasyarekha Book Launch
 
मुंबई (Maharashtrachya Hasyarekha Book Launch) : राजकीय मतभेद बाजूला ठेवत गुरुवार, दि. २९ ऑक्टोबर रोजी मुंबईतील दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक सभागृहात सभागृहात ‘महाराष्ट्राच्या हास्यरेषा’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पार पडला. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी उद्धव ठाकरे यांनी व्यंगचित्रकलेचे महत्त्व अधोरेखित करत आपल्या वडिलांच्या अर्थात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या व्यंगचित्रकलेच्या आठवणींना उजाळा दिला.
 
व्यंगचित्र म्हणजे केवळ वेड्यावाकड्या रेघोट्या नव्हेत!
 
उद्धव ठाकरे म्हणाले की, व्यंगचित्रकार म्हणजे केवळ वेड्यावाकड्या रेघोट्या मारणे किंवा एखाद्याचे शारीरिक व्यंग दाखवणे नव्हे. तर एखाद्या व्यक्तीचे स्वभाववैशिष्ट्य, वृत्ती आणि परिस्थितीतील विसंगती अचूकपणे टिपणे हे खऱ्या व्यंगचित्रकाराचे वैशिष्ट्य आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे नेहमी ‘रीडिंग इन बिटवीन द लाइन्स’ अर्थात दोन ओळींमधील दडलेला अर्थ समजून घेण्याचे महत्त्व सांगायचे. बातम्या वाचताना दोन ओळींमध्ये दडलेला अर्थ व्यंगचित्रकार आपल्या चित्रातून दाखवतो, असेही त्यांनी स्पष्ट केले. (Maharashtrachya Hasyarekha Book Launch)

बाळासाहेबांच्या ‘फटकारे’ पुस्तकाचा सांगितला किस्सा!
 
यावेळी उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या ‘फटकारे’ या व्यंगचित्र संग्रहाच्या निर्मितीचा किस्साही सांगितला. बाळासाहेबांची प्रकृती खालावत असताना एकदा त्यांनी आपली व्यंगचित्रकार म्हणून ओळख मागे पडत असल्याची खंत व्यक्त केली होती. त्यानंतर त्यांची व्यंगचित्रे पुस्तकाच्या माध्यमातून जतन करण्याचा विचार पुढे आला. पुस्तकाची प्रत दाखवण्यासाठी उद्धव ठाकरे लीलावती रुग्णालयात गेले असता, पुस्तकाचे नाव काय ठेवायचे, असे विचारल्यावर बाळासाहेबांनी क्षणाचाही विलंब न करता ‘फटकारे’ असे नाव सुचवले होते. बाळासाहेबांची व्यंगचित्रे केवळ हास्य निर्माण करणारी नव्हती, तर त्यातून समाजातील चुकीच्या गोष्टींवर नेमके भाष्य केले जात होते, असे त्यांनी सांगितले. (Maharashtrachya Hasyarekha Book Launch)
 
"बाळासाहेब हे संपूर्ण आशिया खंडातील एकमेव व्यंगचित्रकार"
 
जगप्रसिद्ध व्यंगचित्रकार चर्चिल यांच्या ८o व्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या आयुष्यावर आधारित ‘Churchill: A Life in Cartoons’ हे पुस्तक प्रकाशित करण्यात आले होते. या पुस्तकात जगभरातील नामवंत व्यंगचित्रकारांच्या कलाकृतींचा समावेश करण्यात आला होता. त्यामध्ये बाळासाहेब ठाकरे यांच्या तीन व्यंगचित्रांना स्थान मिळाले होते. (Maharashtrachya Hasyarekha Book Launch)
 
संपूर्ण आशिया खंडातून केवळ बाळासाहेब ठाकरे यांचीच व्यंगचित्रे या पुस्तकात प्रकाशित करण्यात आली होती, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
 
‘ठाकरे म्हणून आम्ही एकत्र आहोतच!’
 
उद्धव ठाकरे यांनी यावेळी आपल्या आणि राज ठाकरे यांच्या व्यंगचित्रकलेच्या प्रवासाचाही उल्लेख केला. राजचे पहिले व्यंगचित्र आणि आपले शेवटचे व्यंगचित्र जवळपास एकाच वर्षी प्रसिद्ध झाले होते, अशी आठवण त्यांनी सांगितली. तसेच बाळासाहेबांची व्यंगचित्रे, त्यांचे ब्रश आणि त्यांच्याकडून मिळालेल्या कलात्मक वारशाचे महत्त्वही त्यांनी अधोरेखित केले. ‘शिवसेना काय, भाजप काय, आम्ही सगळेच म्हणजे ठाकरे म्हणून तर आम्ही एकत्र आहोतच,’ असे विधानही त्यांनी केले. (Maharashtrachya Hasyarekha Book Launch)
 
"कप चांदीचा की लाकडाचा?"
 
उद्धव ठाकरे यांनी १९८३ च्या क्रिकेट विश्वचषक विजयाची एक आठवण सांगितली. भारताने विश्वचषक जिंकल्यानंतर बाळासाहेब ठाकरे यांनी उद्धव यांना विजयी भारतीय संघाचे व्यंगचित्र काढण्यास सांगितले होते. त्यानुसार उद्धव ठाकरे यांनी व्यंगचित्र तयार केले आणि ते बाळासाहेबांना दाखवले. (Maharashtrachya Hasyarekha Book Launch)
 
मात्र, व्यंगचित्र पाहिल्यानंतर बाळासाहेबांनी मिश्किलपणे विचारले, “हा कप चांदीचा आहे की लाकडाचा?” बाळासाहेबांच्या या एका प्रश्नातून त्यांची व्यंगचित्राकडे पाहण्याची बारकाईची नजर आणि मिश्किल स्वभाव दिसून आला, असा हा किस्सा उद्धव ठाकरे यांनी सांगितला.
 
‘हास्यरेषा पुसू नका’; व्यंगचित्रकारांचे केले कौतुक!
 
‘महाराष्ट्राच्या हास्यरेषा’ या पुस्तकाचे संपादक आणि व्यंगचित्रकार प्रशांत कुलकर्णी यांचे कौतुक करताना उद्धव ठाकरे म्हणाले की, माणसाच्या तळहातावर अनेक रेषा असतात. त्या रेषा आपण मिटवू शकत नाही; मात्र माणसाच्या आयुष्यात हास्याची रेषा निर्माण करण्याचे काम व्यंगचित्रकार करतो. आजच्या काळात आपल्या आयुष्यातील हास्यरेषा पुसत चालली आहे. त्यामुळे छोट्या-मोठ्या गंमतीजमती मनापासून स्वीकारल्या पाहिजेत. त्या स्वीकारल्या तरच आयुष्यातील हास्यरेषा अधिक ठळकपणे अधोरेखित करता येईल, असा मिश्किल सल्ला त्यांनी उपस्थितांना दिला. (Maharashtrachya Hasyarekha Book Launch)
 
 




मुंबई तरुण भारत वेब टीम

Hello, You must be familiar with the Nation First approach daily 'Mumbai Tarun Bharat' as a newspaper committed to fearless and nationalist ideals and constantly doing conscious journalism for it. The journey of four decades has been successful only because of your trust and cooperation. Dear readers, we have been making a successful effort to always be perfect in our commitment to the thoughts of the nation and the national interest...
 
Changing with time is essential for any organization. Daily 'Mumbai Tarun Bharat' has decided to take this role here too and make 'MahaMTB' available in the media for the new 'smart' generation. Today's youth, readers, and citizens are becoming more and more 'smart' day by day. And in today's 'smart' era, information is available in abundance in the Internet-enabled information explosion. However, there is a need for complementary knowledge to determine a modern role and approach that is compatible with culture, motionlessness and tradition.
 
That is why mahamtb.com, MahaMTB Mobile App', MahaMTB Youtube Channel, MahaMTB Facebook Page, MahaMTB Twitter, MahaMTB Instagram, MahaMTB Telegram, MahaMTB WhatsApp Group etc. through social media and advanced avatar content. We are coming before you. Role in the new era, 'smart' journalism with a view, 'smart' multimedia for the new era, and journalism for a 'smart' Maharashtra will be the side of the game.
 
Now get all the updates in one click! mahamtb.com
संबंधित मजकूर