जरांगेंच्या कथित ऑडिओ क्लिपबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश

 
 
Manoj Jarange Audio Clip
 
मुंबई (Manoj Jarange Audio Clip): मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांनी समोर आणलेल्या कथित ऑडिओ क्लिपची फॉरेन्सिक पद्धतीने चौकशी होणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे. या प्रकरणाने महायुतीतील शिवसेना आणि भाजप यांच्यातील चर्चा अधिक तीव्र झाली असून, दोन्ही पक्षांनी क्लिपची सत्यता तपासण्याची मागणी केली आहे. (Manoj Jarange Audio Clip)
 
मुख्यमंत्र्यांचे आश्वासन:
 
नागपूरमध्ये पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत मतदान केल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “या क्लिपची फॉरेन्सिक तपासणी करून त्यातील सत्य जनतेसमोर आणले जाईल.” 
 
त्यांनी असेही विचारले की, या कथित संभाषणात नेमके काय आहे, ते अडीच वर्षांनंतर का समोर आले आणि या प्रकरणातून कोणाला लक्ष्य केले जात आहे. मनोज जरांगे-पाटील, शिवसेनेचे शिष्टमंडळ आणि भाजप या तिन्ही बाजूंनी चौकशीची मागणी असल्याचेही त्यांनी सांगितले.  (Manoj Jarange Audio Clip)
 
शिवसेनेचा आरोप:
 
मराठा समाजात गैरसमज निर्माण करून महायुतीत फूट पाडण्याचा प्रयत्न होत आहे. पक्षाने असेही म्हटले की, मराठा आरक्षण, कुणबी प्रमाणपत्रांचे वाटप आणि मराठा युवकांच्या रोजगाराबाबत एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री असताना महत्त्वाचे निर्णय घेतले होते; त्यामुळे सामाजिक सलोखा राखण्यासाठी सत्य जनतेसमोर आणणे आवश्यक आहे. असा आरोप शिवसेना पक्षाने केला आहे.
 
या प्रकरणी विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर, खासदार रवींद्र वायकर, मिलिंद देवरा, आमदार हेमंत पाटील आणि राहुल शेवाळे यांच्यासह अनेक नेत्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि कथित क्लिपची निष्पक्ष आणि सखोल चौकशी करण्याची मागणी केली.
 
कथित ऑडिओमध्ये खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याबाबत केलेल्या विधानाची तातडीने चौकशी करावी आणि आरोपांमागे राजकीय हेतू आहे का?, हेही तपासावे, अशी मागणी राहुल शेवाळे यांनी केली आहे.  (Manoj Jarange Audio Clip)
 
भाजपची भूमिका:
 
या प्रकरणावर सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी स्पष्ट केले की, कथित ऑडिओ क्लिपशी भाजपचा काहीही संबंध नाही, पुराव्याशिवाय अशा क्लिपवर विश्वास ठेवणे योग्य नाही असेही त्यांनी म्हटले आहे.
 
या क्लिपमधील कुठलाही आवाज भाजपच्या नेत्याचा नाही. ही क्लिप कशी बाहेर आली?, तिची सत्यता काय?, त्यात AI तंत्रज्ञानाचा वापर झाला आहे का? आणि ती क्लिप जरांगे यांच्याकडे कोणी पोहोचवली, याची चौकशी झाली पाहिजे, अशी भूमिका आशिष शेलार यांनी घेतली आहे.
 
उदय सामंत यांच्याबद्दलचा गैरसमज दूर केला जाईल आणि एकनाथ शिंदे यांच्यावर निरर्थक प्रश्नचिन्ह उभे करणे योग्य नाही, असेही त्यांनी सांगितले.  (Manoj Jarange Audio Clip)
 
राज ठाकरेंवर टीका:
 
राज ठाकरे यांनी पोस्ट केलेल्या व्हिडिओबाबत-
“ऑडिओ क्लिप, डॉक्युमेंट्री किंवा सिनेमाला सत्याचा आधार असणे आवश्यक आहे. सत्य असेल तर डॉक्युमेंट्री बनवणाऱ्यांनी पोलिसांना सहकार्य करावे. हा बदनामीचा कट आहे,” अशी टीका आशिष शेलार यांनी केली आहे.
 
भाजप अशा बदनामीला सहन करणार नाही आणि सत्य असेल तर ते जनतेसमोर मांडावे. असेही त्यांनी स्पष्ट केले.  (Manoj Jarange Audio Clip)
 
सद्यस्थिती:
 
सध्या कथित ऑडिओ क्लिपची सत्यता, तिचा स्रोत आणि त्यामागील उद्देश यांची फॉरेन्सिक तपासणी होणार आहे. 
मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आश्वासन दिले असले तरी क्लिपची प्रामाणिकता आणि त्यातील आरोपांची अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नाही. त्यामुळे पुढील चौकशी फॉरेन्सिक अहवालावर अवलंबून राहील.  (Manoj Jarange Audio Clip)
 
 
 




मुंबई तरुण भारत वेब टीम

Hello, You must be familiar with the Nation First approach daily 'Mumbai Tarun Bharat' as a newspaper committed to fearless and nationalist ideals and constantly doing conscious journalism for it. The journey of four decades has been successful only because of your trust and cooperation. Dear readers, we have been making a successful effort to always be perfect in our commitment to the thoughts of the nation and the national interest...
 
Changing with time is essential for any organization. Daily 'Mumbai Tarun Bharat' has decided to take this role here too and make 'MahaMTB' available in the media for the new 'smart' generation. Today's youth, readers, and citizens are becoming more and more 'smart' day by day. And in today's 'smart' era, information is available in abundance in the Internet-enabled information explosion. However, there is a need for complementary knowledge to determine a modern role and approach that is compatible with culture, motionlessness and tradition.
 
That is why mahamtb.com, MahaMTB Mobile App', MahaMTB Youtube Channel, MahaMTB Facebook Page, MahaMTB Twitter, MahaMTB Instagram, MahaMTB Telegram, MahaMTB WhatsApp Group etc. through social media and advanced avatar content. We are coming before you. Role in the new era, 'smart' journalism with a view, 'smart' multimedia for the new era, and journalism for a 'smart' Maharashtra will be the side of the game.
 
Now get all the updates in one click! mahamtb.com
संबंधित मजकूर