महाराष्ट्राची अर्थव्यवस्था १ ट्रिलियन डॉलरपर्यंत नेण्याच्या उद्दिष्टात रसायन उद्योग महत्त्वाची भूमिका बजावेल! -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

रसायन उद्योगाच्या विकासाला नवी गती; महाराष्ट्राचे स्वतंत्र धोरण लवकरच!

 

Maharashtra Chemical Industry Policy 
 
मुंबई (Maharashtra Chemical Industry Policy): महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा यांच्या हस्ते दि. २२ ऑक्टोबर २०२६ रोजी मुंबई येथे 'India Chem 2026' चे उदघाटन पार पडले.
 
देशाच्या रसायन उद्योगात महाराष्ट्राचे मोठे योगदान असून राज्यात सुमारे ३६०० उद्योग कार्यरत आहेत. देशाच्या रसायन क्षेत्रातील सकल मूल्यवर्धनात महाराष्ट्राचा १९%, तर निर्यातीत १७% वाटा असून राज्यात पेट्रोकेमिकल्स, विशेष रसायने, कृषी रसायने आणि औषधनिर्मिती क्षेत्रातील उद्योगांची मजबूत परिसंस्था विकसित झाली आहे. (Maharashtra Chemical Industry Policy)
 
पालघर येथील वाढवण बंदराच्या परिसरात भव्य रसायन पार्क उभारण्यासाठी २५०० ते ५००० एकर जमीन संपादित करण्याचा राज्य सरकारचा मानस आहे. महाराष्ट्र सरकार रसायन उद्योगासाठी स्वतंत्र आणि विशेष धोरण तयार करण्याच्या अंतिम टप्प्यात असून नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत ते पूर्ण होईल. या धोरणातून उद्योगांच्या गरजा, भविष्यातील गुंतवणूक आणि उद्योगस्नेही वातावरणनिर्मितीला प्राधान्य दिले जाणार आहे असे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.  (Maharashtra Chemical Industry Policy)
 
जेनेरिक औषधनिर्मितीमध्ये भारताचे जागतिक स्थान अधिक बळकट करण्यासाठी महाराष्ट्रात बल्क ड्रग पार्क उभारून औषधनिर्मिती क्षेत्रासाठी सक्षम औद्योगिक परिसंस्था विकसित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
 
तळोजा आणि नवी मुंबई येथे विशेष रसायने, पॉलिमर्स व औद्योगिक रसायने, तारापूर आणि पालघरमध्ये रासायनिक प्रक्रिया, औषधनिर्मिती व रंगद्रव्ये, तर पाताळगंगा आणि रोहा येथे पेट्रोकेमिकल्स व सेंद्रिय रसायनांशी संबंधित उद्योग विकसित झाले आहेत. तसेच लोटे परशुराम, कुरकुंभ आणि विदर्भातील बुटीबोरी येथेही रसायन उद्योगाची मजबूत परिसंस्था निर्माण झाली आहे. याशिवाय कोल गॅसिफिकेशनचे ५ महत्त्वपूर्ण प्रकल्प प्रगत टप्प्यात आहेत.  (Maharashtra Chemical Industry Policy)
 
राज्यातील गुंतवणूकदारांना सुलभ सेवा उपलब्ध करून देण्यासाठी ‘मैत्री’ एकल खिडकी प्रणाली आणि ‘इन्व्हेस्ट महाराष्ट्र’च्या माध्यमातून उद्योगस्नेही व्यवस्था अधिक सक्षम करण्यात येत आहे. सध्या राज्यातील रसायन उद्योगातून सुमारे ३,००,००० रोजगार निर्माण होत असून योग्य धोरणांच्या माध्यमातून रोजगार दुप्पट आणि गुंतवणूक तिप्पट करण्याची क्षमता असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.  (Maharashtra Chemical Industry Policy)
 
२०३० पर्यंत महाराष्ट्राची अर्थव्यवस्था १ ट्रिलियन डॉलरपर्यंत नेण्याच्या उद्दिष्टात रसायन उद्योग महत्त्वाची भूमिका बजावेल. तसेच जागतिक पुरवठा साखळीतील बदलांमुळे भारतासमोर नवीन संधी निर्माण झाल्या आहेत. बॅटरी तंत्रज्ञान, इलेक्ट्रॉनिक्स आणि संबंधित रसायन उद्योगांमध्ये गुंतवणुकीच्या मोठ्या संधी उपलब्ध असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले आहे.  (Maharashtra Chemical Industry Policy)
 
यावेळी, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव, ओडिशाचे मुख्यमंत्री मोहन चरण माझी, केंद्रीय राज्यमंत्री अनुप्रिया पटेल, गुजरातचे राज्यमंत्री प्रफुल पानशेरिया, फिक्की राष्ट्रीय पेट्रोकेमिकल्स समितीचे अध्यक्ष, एचएमईएलचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी प्रभ दास, यूपीएलचे अध्यक्ष आणि समूहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी जय श्रॉफ व इतर मान्यवर उपस्थित होते.  (Maharashtra Chemical Industry Policy)
 
 




मुंबई तरुण भारत वेब टीम

Hello, You must be familiar with the Nation First approach daily 'Mumbai Tarun Bharat' as a newspaper committed to fearless and nationalist ideals and constantly doing conscious journalism for it. The journey of four decades has been successful only because of your trust and cooperation. Dear readers, we have been making a successful effort to always be perfect in our commitment to the thoughts of the nation and the national interest...
 
Changing with time is essential for any organization. Daily 'Mumbai Tarun Bharat' has decided to take this role here too and make 'MahaMTB' available in the media for the new 'smart' generation. Today's youth, readers, and citizens are becoming more and more 'smart' day by day. And in today's 'smart' era, information is available in abundance in the Internet-enabled information explosion. However, there is a need for complementary knowledge to determine a modern role and approach that is compatible with culture, motionlessness and tradition.
 
That is why mahamtb.com, MahaMTB Mobile App', MahaMTB Youtube Channel, MahaMTB Facebook Page, MahaMTB Twitter, MahaMTB Instagram, MahaMTB Telegram, MahaMTB WhatsApp Group etc. through social media and advanced avatar content. We are coming before you. Role in the new era, 'smart' journalism with a view, 'smart' multimedia for the new era, and journalism for a 'smart' Maharashtra will be the side of the game.
 
Now get all the updates in one click! mahamtb.com
संबंधित मजकूर