महाराष्ट्रात गुंतवणुकीचा महाकुंभ! ८.५७ लाख कोटींची गुंतवणूक; २.९१ लाख रोजगारांची संधी

 
 Maharashtra Investment Summit 2026
 
मुंबई (Maharashtra Investment Summit 2026) : महाराष्ट्रातील औद्योगिक विकासाला मोठी चालना देणाऱ्या महाराष्ट्र इन्व्हेस्टमेंट समिटमध्ये तब्बल ८ लाख ५७ हजार ४५२ कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे ६७ सामंजस्य करार (MoUs) करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत या करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. प्रस्तावित गुंतवणुकीतून राज्यात २ लाख ९१ हजार १०९ रोजगारांच्या निर्मितीची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
 
या सामंजस्य करारांमध्ये एरोस्पेस अँड डिफेन्स तसेच ऊर्जा आणि क्लीनटेक क्षेत्रातील प्रत्येकी १० करारांचा समावेश आहे. गुंतवणुकीच्या दृष्टीने डेटा सेंटर्स, माहिती-तंत्रज्ञान आणि सेमिकंडक्टर क्षेत्र आघाडीवर असून, या क्षेत्रांमध्ये एकूण ४ लाख १५ हजार ४९० कोटी रुपयांची गुंतवणूक प्रस्तावित आहे. (Maharashtra Investment Summit 2026)
 
 
 
ऊर्जा आणि क्लीनटेकमध्ये मोठी गुंतवणूक
 
ऊर्जा, क्लीनटेक, नवीकरणीय ऊर्जा, बॅटरी एनर्जी आणि कॉम्प्रेस्ड बायोगॅस क्षेत्रात १ लाख २ हजार ५१९ कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे करार झाले आहेत. अंतरिक्ष व संरक्षण क्षेत्रात २७ हजार ९३० कोटी रुपये, तर मेटल्स आणि मायनिंग क्षेत्रात ७५ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक प्रस्तावित आहे. (Maharashtra Investment Summit 2026)
 
याशिवाय इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रात १२ हजार ६५१ कोटी रुपये, आरोग्य क्षेत्रात ६ हजार ५०० कोटी रुपये, तर पायाभूत सुविधा, लॉजिस्टिक्स आणि बांधकाम साहित्य क्षेत्रात १८ हजार ७५१ कोटी रुपयांचे करार करण्यात आले आहेत. स्टील उत्पादन क्षेत्रातही ७ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक प्रस्तावित आहे. (Maharashtra Investment Summit 2026)

विविध क्षेत्रांमध्ये गुंतवणुकीचा विस्तार
 
केमिकल्स, शेती, सेवा आणि ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटर्स (GCC) क्षेत्रात एकूण ८ हजार ८०१ कोटी रुपयांची गुंतवणूक प्रस्तावित आहे. याशिवाय अन्य विविध क्षेत्रांमध्ये १ लाख ८२ हजार ८१० कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे.
 
या सामंजस्य करारांमुळे महाराष्ट्रातील औद्योगिक विस्ताराला चालना मिळण्यासोबतच आधुनिक तंत्रज्ञानाधारित उद्योग, नवीन गुंतवणूक आणि रोजगारनिर्मितीला वेग मिळण्याची अपेक्षा आहे. मात्र, सामंजस्य करारांतील प्रस्तावित गुंतवणूक आणि रोजगाराची आकडेवारी प्रत्यक्ष अंमलबजावणीदरम्यान बदलू शकते. (Maharashtra Investment Summit 2026)
 
 




मुंबई तरुण भारत वेब टीम

Hello, You must be familiar with the Nation First approach daily 'Mumbai Tarun Bharat' as a newspaper committed to fearless and nationalist ideals and constantly doing conscious journalism for it. The journey of four decades has been successful only because of your trust and cooperation. Dear readers, we have been making a successful effort to always be perfect in our commitment to the thoughts of the nation and the national interest...
 
Changing with time is essential for any organization. Daily 'Mumbai Tarun Bharat' has decided to take this role here too and make 'MahaMTB' available in the media for the new 'smart' generation. Today's youth, readers, and citizens are becoming more and more 'smart' day by day. And in today's 'smart' era, information is available in abundance in the Internet-enabled information explosion. However, there is a need for complementary knowledge to determine a modern role and approach that is compatible with culture, motionlessness and tradition.
 
That is why mahamtb.com, MahaMTB Mobile App', MahaMTB Youtube Channel, MahaMTB Facebook Page, MahaMTB Twitter, MahaMTB Instagram, MahaMTB Telegram, MahaMTB WhatsApp Group etc. through social media and advanced avatar content. We are coming before you. Role in the new era, 'smart' journalism with a view, 'smart' multimedia for the new era, and journalism for a 'smart' Maharashtra will be the side of the game.
 
Now get all the updates in one click! mahamtb.com
संबंधित मजकूर