या मिळालेल्या ‘फॉर्म्युला’चा उपयोग करून भारत सरकारकडून सगळ्या चाचण्या होण्यापूर्वीच ‘सीरम’ने कोट्यवधी रुपयांचा धोका पत्करून कोरोनाच्या ’कोव्हिशिल्ड’ या लसीची निर्मिती करण्यास सुरुवात केली आणि या जागतिक संकटसमयी पूनावाला हे पुन्हा एकदा भारताचे पर्यायाने संपूर्ण जगाचे तारणहार बनले. या ‘सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया’चा सगळा कारभार आता सायरस पूनावाला यांचा मुलगा आदर पूनावाला हे बघतात. जगाला फक्त लस आणि औषध पुरवणे एवढाच काम न करता जागतिक स्वच्छता आणि बालसंगोपनासाठी पण ‘सीरम’ काम करते. अशा या दानशूर व जागतिक संकटसम
Read More