टी-सीरीज, कलर यल्लो प्रॉडक्शन आणि चलचित्र मंडळी यांच्या बहुप्रतीक्षित चित्रपट ‘फसक्लास दाभाडे’चा जबरदस्त ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. सोनू आणि कोमलच्या हळदी समारंभात धमाल केल्यानंतर आता दाभाडे कुटुंब ट्रेलर लाँचच्या निमित्ताने सगळ्यांच्या भेटीला आले. हा धमाकेदार ट्रेलर लाँच सोहळा नुकताच संपन्न झाला.
Read More
काही दिवसांपूर्वीच दाभाडे कुटुंबीयांनी गुलाबी थंडीत मस्त 'यल्लो यल्लो' हळदीचा जबरदस्त समारंभ साजरा केला. त्यावेळी या दाभाडे कुटुंबाची थोडी तोंडओळख प्रेक्षकांना झालीच. मात्र नुकत्याच प्रदर्शित झालेल्या टीझरमधून ही दाभाडे फॅमिली का फसक्लास आहे, याचा अंदाजही प्रेक्षकांना आला आहे. 'फसक्लास दाभाडे' चित्रपटाचा टिझर नुकताच सोशल मीडियावर झळकला असून या कुटुंबाला भेटण्याची आता प्रेक्षकांना प्रचंड उत्सुकता लागली आहे. हेमंत ढोमे लिखित, दिग्दर्शित या चित्रपटात क्षिती जोग, सिद्धार्थ चांदेकर, अमेय वाघ, निवेदिता सराफ, हरिष