रशियाने युक्रेनवर आजपर्यंतचा सर्वात मोठा हल्ला केला आहे. ४७९ ड्रोनसह विविध क्षेपणास्त्रे रशियाने एका रात्रीत युक्रेनवर डागली आहेत. आतापर्यंतचा एका रात्रीतील रशियाचा हा सर्वात मोठा हल्ला आहे.
Read More
राज्यातील अवैध गौण खनिज उत्खननाला चाप लावण्यासाठी ड्रोनद्वारे खाणपट्ट्यांचे सर्वेक्षण करण्यासाठी प्रायोगिक तत्त्वावर निविदा प्रक्रिया राबवण्याचे निर्देश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.
( Ban flying drones in Thane city ) ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत आता ड्रोन किंवा इतर मानवरहित हवाई वस्तू उडवण्यास मनाई करण्यात आली आहे. शहरात काही समाजकंटकांकडून या उपकरणांचा वापर होण्याची शक्यता लक्षात घेता, कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी तसेच सार्वजनिक शांतता भंग होऊ नये यासाठी हे प्रतिबंधात्मक पाऊल उचलण्यात आले आहे.
'युद्धस्य कथा रम्या’ अशी एक म्हण आहे. परंतु, आता बदलत्या ‘स्मार्ट’ युगात युद्धस्य कथा या डिजिटल स्वरुपात म्हणजेच ‘स्मार्ट’ तंत्रज्ञानाच्या साहाय्याने लढल्या जातील. युद्ध कथा वाचण्यासाठी किंवा ऐकण्यासाठीच चांगल्या वाटतात. मात्र, त्याचा प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष अनुभव ज्यांना येतो, त्यांच्यावर त्याचे नक्कीच दूरगामी परिणाम दिसून येतात. तरीही जग हे नेहमीच युद्धाच्या तयारीत असते. हे युद्ध कधीकाळी जमिनीवर लढले जायचे, त्यात कालपरत्वे बदल होत जाऊन ते पाण्यात आणि आकाशातही लढले जाऊ लागले.