लोकसभेत अविश्वास प्रस्तावावरील चर्चेदरम्यान एका महिला खासदाराला फ्लाइंग किस दिल्याचा आरोप काँग्रेस नेते राहुल गांधींवर करण्यात आला होता. या कृत्याबद्दल भाजपच्या महिला खासदारांनीही त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली होती. आता काँग्रेसच्या एका महिला आमदाराने आपल्या पक्षाच्या नेत्याच्या बचावासाठी अजब विधान केले आहे. या महिला आमदाराच्या म्हणण्यानुसार, जर राहुल गांधींना फ्लाइंग किस द्यायचे असेल तर ते एका मुलीला देतील?,असे वादग्रस्त विधान केले आहे.
Read More