बांग्लादेशात ढाका येथील दुर्गा माता मंदिर प्रशासनाच्या कडक सुरक्षेत पाडल्याने येथील हिंदूंमध्ये तीव्र सताप निर्माण झाला आहे. या घटनेच्या निषेधार्थ बांगलादेश हिंदू महासंघासह येथील हिंदू-बौद्ध-ख्रिश्चन एकता परिषदेनेही बांग्लादेश बंदची हाक दिली आहे. अनेक शहरांमध्ये या प्रकरणी निदर्शने करण्यात आली. अल्पसंख्याक हिंदू समुदायाने अनेक जिल्हे आणि विद्यापीठ परिसरात मानवी साखळी केल्याचे दिसून आले.
Read More
बांगलादेशात (Bangladesh) हिंदू अल्पसंख्यांकांवर अत्याचार आणि त्यांच्या धार्मिक स्थळांवरील हल्ले थांबताना दिसत नाहीत. या प्रकरणामध्ये गोपालगंज जिल्ह्यातील काशियानीमधील तारेल नॉर्थपारा गावातील दुर्गा मंदिर आणि शितला मंदिराला गुरूवारी २१ जानेवारी २०२५ रोजी सकाळी आग लागल्याची दुर्देवी घटना घडली होती. या आगीमध्ये मंदिराचे मोठे नुकसान झाले आहे. दुर्गा मंदिरातील पु़जेचे साहित्य जळून खाक झाले होते. देवींच्या मूर्तींची विटंबना झाली होती. या घटनेनंतर गावामध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते.
'786', 'Allah' उत्तर प्रदेशातील बरेली या शहरातील बिहारीपूरमध्ये असलेल्या आला हजरत दर्ग्याजवळ असलेल्या प्राचीन दुर्गा मंदिरा़च्या भिंतीवर काही समाजकंटकांनी 786 असा मुस्लिम धर्मासाठी लकी असलेला क्रमांक लिहिला. तसेच त्या भिंतीवर अल्लाह असेही नाव लिहिले. गुरूवारी उत्तर प्रदेशातील बरेलीमध्ये जातीय तणाव निर्माण झाला असल्याची घटना घडली आहे. त्यानंतर आता पोलिसांना माहिती देण्यात आली असून संबंधित आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उत्तर प्रदेशातील देवरियाच्या सलेमपूर कोतवाली भागातील मझौलीराझ येथे बुधवारी १६ ऑक्टोबर रोजी दुर्गा मूर्तीच्या विसर्जनासाठी हिंदू मिरवणूक काढत होते. ही मिरवणूक गंडक नदीच्या तीरावर जाणार होती. यामध्ये तरुणांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता. ही मिरवणूक माढाळीराजाच्या शाही चौकात पोहोचली असता, काही कट्टरपंथींनी घसखोरी करत तरूणांसोबत वाद घातला. त्यावेळी राजन पटेल नावाच्या युवकावर चाकूने हल्ला केला असल्याची माहिती आहे.
Islamic Flag झारखंडच्या गिरडिहमध्ये मंदिरासमोर इस्लामिक ध्वज (Islamic Flag) लावण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला. यामुळे या परिसरात तणावाचे वातावरण आहे. सारिया पोलीस ठाणे परिसरात पोलिसांनी हे प्रकरण हाताळले गेले. यावेळी इस्लामी ध्वज हटवण्यात आला असून तणावाच्या पार्श्वभूमीवर घटनास्थळी परिसरात सुरक्षा वाढवण्यात आली. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात असल्याचे सांगितले.
उत्तर प्रदेशातील बस्ती जिल्ह्यात देवी जागरण कार्यक्रमादरम्यान काही कट्टरपंथीयांनी गोंधळ घातल्याची घटना घडली आहे. स्टेजवर भजन गात असलेल्या दोन व्यक्तींवर २ कट्टरपंथी मुलींनी काळे कपडे फेकले. त्यासोबतच गायकाचा माईक हिसकावून ‘इस्लाम झिंदाबाद’ आणि ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा दिल्या.
https://sangraha.net/s90/NBImages/12021/2023/10/25/kashi_202310251414334366.jpg