कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगडावरुन कंदीलपुष्प म्हणजेच 'सेरोपेजिया' वनस्पतीच्या नव्या प्रजातीचा शोध लावण्यात आला आहे (new species of ceropegia). या प्रजातीचे नामकरण छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावे 'सेरोपेजिया शिवरायीयाना', असे करण्यात आले आहे (new species of ceropegia). वेलवर्गीय असणाऱ्या या कंदीलपुष्पाच्या केवळ चार वेल संशोधकांना विशालगडावर आढळून आल्या आहेत. (new species of ceropegia)
Read More
किल्ले विशाळगड येथील अतिक्रमण काढण्याबाबत आंदोलकांनी गडावरुन परत येताना मौजे गजापुर येथील मुसलमानवाडी या गावातील घरांचे व प्रार्थना स्थळाचे नुकसान केले. याबाबत नुकसानग्रस्त भागाची पाहणी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.
मराठ्यांच्या पराक्रमी इतिहासाच्या प्रत्येक पानाचा साक्षीदार असणारा विशाळगड हा किल्ला कोल्हापूरच्या वायव्येस अवघ्या 76 किमी अंतरावर आहे. नावाप्रमाणेच विशाल असे याचे स्वरूप, बघताच क्षणी कोणालाही मोहिनी घालणारे. हा प्राचीन किल्ला अनुस्कुरा घाट व आंबा घाट, कोकणातील बंदरे व कोल्हापूरची बाजारपेठ यांना जोडणार्या घाटमार्गावर लक्ष ठेवण्यासाठी व संरक्षणासाठी बांधला गेला असावा.
पश्चिम घाटाच्या sahyadri पर्यावरणीय संवेदनशील क्षेत्राला लागून असलेले कोल्हापूर जिल्ह्यातील ६० हेक्टर राखीव वनक्षेत्र बाॅक्ससाईड खाणकामासाठी वळते करण्यात येणार आहे. शाहूवाडी तालुक्यातील पठार (सडा) पट्ट्यातील हे राखीव वनक्षेत्र खाणकामासाठी वळते करण्यासाठी वन विभागाने हिरवा झेंडा दाखवला असून केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाकडूनही त्यास प्रथम टप्प्यातील परवानगी मिळाली आहे. खाणकामाचे हे क्षेत्र पश्चिम घाटाचे sahyadri पर्यावरणीय क्षेत्र, व्याघ्र भ्रमणमार्गालगत असून 'विशाळगड काॅन्झर्वेशन रिझर्व्ह'पासून काही किलोमीटर अ