जमीयत उलेमा-ए-हिंदने काँग्रेसला बजरंग दलावर बंदी घालण्याचे निवडणुकी आधी दिलेले आश्वासन पुर्ण करण्यास सांगितले आहे. तसे न झाल्यास आगामी निवडणुकीत मुस्लिमांचा पाठिंबा न मिळण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. कर्नाटक विधानसभा निवडणुकीदरम्यान काँग्रेसने बजरंग दलाची तुलना प्रतिबंधित कट्टरवादी संघटना पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) सोबत केली . तसेच बजरंग दलावर बंदी घालण्याचे आश्वासन ही कर्नाटकातील जनतेला दिले. मात्र, नंतर पक्ष मागे पडला आणि प्रत्येक जिल्ह्यात बजरंगबली मंदिर बांधण्याचे आश्वासन दिले.
Read More
१८ फेब्रुवारी २०२२ रोजी अहमदाबाद साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात विशेष न्यायालयाने ३८ दहशतवाद्यांना फाशीची शिक्षा सुनावली. तसेच ११ जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. या दहशतवाद्यांच्या बचावासाठी जमियत उलेमा-ए-हिंद पुढे आले आहे. त्यांच्यासाठी उच्च न्यायालयात कायदेशीर लढा लढणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. त्याचवेळी या स्फोटाचा मास्टरमाईंड सफदर नागोरी याने राज्यघटनेपेक्षा कुराणचे महत्व अधिक असल्याचे म्हंटले जात आहे.नागोरी यांनाही फाशीची शिक्षा झाली असून ते सध्या भोपाळ मध्यवर्ती कारागृहात आहे.