पुजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात दोषी मानले गेलेले वनमंत्री संजय राठोड यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला आणि हे प्रकरण शांत होईल, अशी चर्चा सर्वत्र सुरु झाली. परंतु आता पुजाची चुलत आजी शांताबाई राठोड यांनी अत्यंत खळबळजनक गौप्यस्फोट केला आहे. 'पूजा चव्हाण प्रकरण दडपण्याचा प्रयत्न सुरू असून त्यासाठी तिच्या आई-वडिलांना ५ कोटी रुपये मिळाले आहेत,' असं शांताबाई राठोड यांनी म्हटलं आहे.
Read More
भाजप नेते निलेश राणे यांनी संजय राठोड प्रकरणावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली
पुण्यातील २२ वर्षीय तरुणी पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी विरोधकांकडून आरोप झाल्यानंतर गेल्या १५ दिवसांपासून गायब असलेले राज्याचे वनमंत्री संजय राठोड हे मंगळवार, दि. २३ फेब्रुवारी रोजी पहिल्यांदाच प्रसारमाध्यमांना सामोरे गेले. पोहरादेवीचे दर्शन घेण्यासाठी पोहरागड येथे जाताना राठोड यांनी मंगळवारी हजारो कार्यकर्त्यांसमवेत शक्तिप्रदर्शन केले.
पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणी आरोपसत्राला सामोरे गेल्यानंतर गायब झालेले राज्याचे वनमंत्री संजय राठोड आज पोहरादेवी गडावर जाणार आहेत. राठोड यांच्या घराबाहेर गाड्यांचा ताफा उभा ठेवण्यात आलेला आहे. इतके दिवस अक्षरशः गायब असणारे राठोड आज सबंध प्रकाराबाबत काय उत्तरं देतील, याकडे संपूर्ण महाराष्ट्रचं लक्ष लागून राहीलेलं आहे.
राज्याचे वनमंत्री आणि शिवसेना नेते संजय राठोड वाशिममधील पोहरादेवी गडावर घेतलेल्या परिषदेत पहिली प्रतिक्रिया दिली
“राज्यात गाजत असलेल्या पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा घेणार नाहीत. कारण, त्यांचा राजीनामा घेतला तर आधीच्या प्रकरणातील आणखी एका मंत्र्याचा राजीनामा घ्यावा लागेल,” अशी बोचरी टीका भाजपचे खासदार नारायण राणे यांनी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांचे नाव न घेता केली.