संरक्षण मंत्रालयाने हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) आणि लार्सन अँड टुब्रो लिमिटेड (एल अँड टी) सोबत अनुक्रमे 70 एचटीटी-40 बेसिक ट्रेनर विमाने आणि 3 कॅडेट प्रशिक्षण जहाजे खरेदीसाठी सामंजस्य करारावर नवी दिल्लीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत स्वाक्षरी केली. यावेळी संरक्षण सचिव गिरधर अरमाने, वरिष्ठ लष्करी अधिकारी, एचएएल आणि एल अँड टीचे प्रतिनिधी उपस्थित होते.
Read More