भुस्खलनाचा इशारा केरळ राज्य सरकारला सात दिवस अगोदरच देण्यात आला होता. मात्र, राज्य सरकारने त्याकडे दुर्लक्ष केले; अशी माहिती केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांनी राज्यसभेत बुधवारी दिली आहे. केरळमधील वायनाड येथील भूस्खलनाच्या घटनेबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा बुधवारी राज्यसभेत निवेदन केले. केरळच्या डाव्या सरकारवर हल्लाबोल करताना ते म्हणाले की, केरळ सरकारला अशा आपत्तीच्या शक्यतेबाबत आधीच इशारा देण्यात आला होता. सहसा अनेक राज्ये अशा इशाऱ्यांकडे लक्ष देतात, परंतु केरळ सरकारने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा
Read More