यूट्यूबर आणि पॉडकास्ट स्टार रणवीर अलाहबादीयाला कोर्टाने कठोर सुनावणी केली आहे. इंडियाज गॉट लेटेंट शो मध्ये अश्लील टिपण्णी केल्याप्रकरणी त्याच्या विरोधात अनेक राज्यांमध्ये तक्रारी दाखल करण्यात आल्या. रणवीर अलाहबादीयाने या विरोधात सुप्रीम कोर्टात धाव घेतली. रणवीर अलाहाबादियाचे हे प्रकरण लवकरच सुनावणीसाठी घेतले जाणार, असे भारताचे सरन्यायाधीश संजीव खन्ना यांनी १४ फेब्रुवारी रोजी म्हटले होते.
Read More
प्रसिद्ध यूट्यूबर आणि पॉडकास्टर रणवीर अलाहबादियाने 'इंडियाज गॉट लॅटेंट' शोवरील वादग्रस्त वक्तव्यांमुळे आपल्याविरोधात मुंबई आणि आसामच्या गुवाहाटी येथे दाखल झालेल्या एफआयआर एकत्रित करण्याची मागणी केली आहे. या प्रकरणावर मंगळवारी, १८ फेब्रुवारी रोजी भारताच्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली.
डिजिटल प्लॅटफॉर्मवरील वाढत्या अश्लील सामग्रीच्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी यूट्यूबवरील अश्लीलतेवर नियंत्रण आणण्याची गरज असल्याचे सांगितले. हा मुद्दा यूट्यूबर रणवीर अल्लाबादिया याने दाखल केलेल्या याचिकेच्या सुनावणीदरम्यान उपस्थित झाला. रणवीर अल्लाबादियाने कॉमेडियन समय रैना याच्या 'इंडियाज गॉट लेटंट' या यूट्यूब शोमध्ये एका अशोभनीय विनोद केल्यामुळे त्याच्यावर वेगवेगळ्या ठिकाणी एफआयआर दाखल झाल्या होत्या. या एफआयआर एकत्रित करण्याची मागणी त्याने केली होती.
इंडीयाज गॉट लेटेंट शोमध्ये अश्लील टिपण्णी केल्यामुळे रणवीर अलाहाबादिया अडचणीत सापडला आहे. रणवीरने सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले. मात्र, दाखल केलेल्या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे.
स्टँड-अप कॉमेडियन समय रैना यांच्या 'इंडियाज गॉट लेटेंट' या शोच्या अलीकडच्या एपिसोडमध्ये यूट्यूबर रणवीर अलाहाबादिया आणि अपूर्वा मखीजा यांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यांमुळे वाद निर्माण झाला आहे. या शोमध्ये रणवीरने एका स्पर्धकाला अत्यंत अश्लील प्रश्न विचारला, ज्यामुळे सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. या घटनेनंतर मुंबईतील वकील आशिष राय आणि पंकज मिश्रा यांनी रणवीर अलाहाबादिया, अपूर्वा मखीजा, समय रैना आणि शोच्या आयोजकांविरुद्ध 'अश्लील भाषा' वापरल्याबद्दल आणि 'अश्लीलतेला प्रोत्साहन दिल्याबद्दल' तक्रार दा
स्टँड-अप कॉमेडियन समय रैना याच्या 'इंडियाज गॉट लेटेंट' या शोच्या अलीकडच्या एपिसोडमध्ये यूट्यूबर रणवीर अलाहाबादिया आणि अपूर्वा मखीजा यांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यांमुळे वाद निर्माण झाला. या शोमध्ये रणवीरने एका स्पर्धकाला अत्यंत अश्लील प्रश्न विचारल्याने, सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. या प्रकरणावरुन सोमवार दि. १० फेब्रुवारी रोजी तक्रार दाखल करण्यात आली.
समय रैनाच्या "इंडियाज गॉट लेटेंट" या शोमध्ये केलेल्या अश्लील वक्तव्यामुळे समय रैना आणि रणवीर अलाहाबादिया वादाच्या भोवऱ्यात सापडलेले आहेत. वादग्रस्त असा प्रश्न अलाहाबादियाने एका स्पर्धकाला चालू कार्यक्रमात विचारला. या एपिसोडमध्ये आशिष चंचलानी, जसप्रीत सिंग आणि अपूर्वा मुखिजा जी इंस्टाग्रामवर 'द रेबल किड' म्हणून ओळखली जाते. यांच्यासारखे कंटेंट क्रिएटर्सही सहभागी होते. रणवीरच्या या वक्तव्यामुळे तो चांगलाच अडचणीत सापडलाय. मनोरंजन विश्वासह राजकीय क्षेत्रातील अनेक नेत्यांनीही त्याच्या वक्तव्यावरून टीका केली आहे.
राष्ट्रीय मानवाधिकार आयोगानंतर (NHRC) आता अखिल भारतीय सिने कामगार संघटनेने (AICWA) यूट्यूबवरील 'इंडियाज गॉट लेटंट' या शोवर कडक कारवाई करण्याची भूमिका घेतली आहे. या शोमध्ये युट्यूबर रणवीर अल्लाहबादिया (BeerBiceps) याने वैयक्तिक जीवनावर आक्षेपार्ह टिप्पणी केल्यानंतर मोठा वाद उफाळला. या घटनेच्या पार्श्वभूमीवर AICWA ने या शोवर संपूर्ण बंदी घालण्याची मागणी केली आहे.