वाडा तालुक्यातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक आणि शेतकरी अवजार, कृषी संशोधन क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणार्या जयवंत हरिश्चंद्र वाडेकर उर्फ दादा वाडेकर यांची नुकतीच वयाच्या ८२व्या वर्षी प्राणज्योत मालवली. वाडेकर यांनी रा. स्व. संघाचे पालघर जिल्ह्याचे माजी संघचालक, पंचायत समिती सदस्य, पालघर जिल्हा भाजपचे प्रसिद्धी प्रमुख अशी विविध पदे भूषविली होती. तसेच एक यशस्वी उद्योजक, स्वातंत्र्यसेनानी, समाजसेवक म्हणूनही ते सुविख्यात होते. त्यांच्या स्मृतींना शब्दसुमनांजली अर्पण करणारे हे लेख...
Read More
शेतकर्याच्या वेदना प्रत्यक्ष जाणून त्यादृष्टीने तयार करण्यात आलेल्या अवजारांचा प्रत्यक्ष वापर करणे, शेतकर्याकडून त्याची चाचपणी करून घेणे, निरीक्षण, सुलभता, सोपेपणा, प्रदीर्घ कामानंतर येणारा थकवा, अवजारासंदर्भात भविष्यात येणारी दुरूस्ती याची परीक्षणे आल्यानंतर त्या अवजाराच्या डिझाईनमध्ये बदल करणे... त्यासाठी संशोधक, सृजनात्मक तसेच संवेदनशील वृत्तीचे दर्शन मला जयवंत हरिश्चंद्र तथा दादा वाडेकर यांच्यात दिसले. नव्हे, तर ते जवळून अनुभवण्याचे भाग्य मला मिळाले.
रा. स्व. संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक दादा वाडेकर यांचे मंगळवार दिनांक १४ रोजी वयाच्या ८२ वर्षी निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. वाड्यातील राहत्या घरी त्यांची प्राणज्योत मालवली. लहानपणापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विचारधारा पुढे नेण्याचं काम त्यांनी अखेरच्या श्वासापर्यंत केले. यशस्वी उद्योगा बरोबर सेंद्रिय शेती करत असताना परिसरातील शेतकऱ्यांची गरज ओळखून त्यांनी शेतीची अवजारे तयार करण्याची कंपनी सुरू केली होती.
दादा माझ्या वडलांच्या पिढीतले. मूळचे अभियांत्रिकी उद्योजक. ठाणे, पालघर जिल्ह्यातल्या वाडा गावचे. तिथे एस्टी स्टँडवर उतरून कोणालाही विचारावं, दादा वाडेकरांचे घर... पत्ता मिळायचा. अनेकांचे पत्ते दादांच्या घराच्या संदर्भाने असायचे. घर काही असामान्य नव्हते. माणूस असामान्य होता...