मराठी चित्रपटसृष्टीतील विनोदाचा बादशाह लक्ष्मीकांत बेर्डे यांची आज (२६ ऑक्टोबर) जयंती. मराठी असो किंवा हिंदी अनेक सुपरहिट चित्रपट लक्ष्मीकांत यांनी दिले. आज जरी ते जगात नसले तरीही त्यांचा चाहता वर्ग आजही त्यांची आठवण काढल्याशिवाय राहात नाही. आपल्या विनोदी शैलीने तब्बल दोन दशके प्रेक्षकांना खळखळून हसवले. आज त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पत्नी प्रिया बेर्डे यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे.
Read More
विनोदाचा बादशाह लक्ष्मीकांत बेर्डे यांनी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीवर अनेक अजरामर कलाकृती भावी पिढीसाठी घडवून ठेवल्या. आणि आता त्यांच्या कलेचा वारसा त्यांची दोनही मुलं स्वानंदी बेर्डे आणि अभिनय बेर्डे (Abhinay Laxmikant Berde) पुढे नेत आहेत. ती सध्या काय करते या चित्रपटातून आपल्या अभिनयाची सुरुवात करणाऱ्या अभिनयने आता रंगभूमीवर देखील पदार्पण केले आहे. रंगभूमीवरील पहिले AI महाबालनाट्य ‘आज्जीबाई जोरात’ या नाटकातून अभिनय बेर्डे रंगभूमीवर येत असून यात त्याच्या सोबतीला ज्येष्ठ अभिनेत्री निर्मिती सावंत असणार आहेत.