(development of the spinning mill and roads) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते चौंडी (जामखेड, अहिल्यानगर) येथे दोन महत्त्वाच्या कामांचे भूमिपूजन झाले. यामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सहकारी सूतगिरणी आणि मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत चौंडी ते निमगाव डाकू रस्त्याचे भूमिपूजन यांचा समावेश आहे. सूतगिरणीसाठी शासनाने ₹९१ कोटींचा निधी दिला आहे. या गिरणीमुळे स्थानिकांना रोजगार आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना फायदा होईल.
Read More