९०च्या दशकातील प्रत्येक वयोगटातील प्रेक्षकांचा आवडता सुपरहिरो म्हणजे शक्तिमान. मुळात गेल्या काही महिन्यांपासून 'शक्तिमान' हा चित्रपट येणार अशा चर्चा रंगल्या होत्या. त्यात रणवीर सिंग प्रमुख भूमिका साकारणार असंही म्हटलं जात होतं. मात्र, आता 'शक्तिमान'बद्दल मोठी अपडेट आली असून स्वतः मुकेश खन्नांनी 'शक्तिमान'चा टीझर रिलीज केला आहे. त्यामुळे 'शक्तिमान' पुन्हा एकदा भेटीला येणार आहे, यावर शिक्कामोर्तब झाला आहे.
Read More
'शक्तिमान' या मालिकेने ९०च्या दशकात तुफान लोकप्रियता मिळवली होती. या सुपरहिरोच्या शो मधून मुकेश खन्ना यांनी लहान मुलांचे मनोरंजन केले.
पुन्हा ऐकू येणार ‘शक्तिमान...शक्तिमान...शक्तिमान...'