“आईने तिच्या मुलाच्या पितृत्वासाठी डीएनए चाचणीस संमती दिली असली, तरीही न्यायालयांनी अल्पवयीन मुलांच्या हक्कांचे रक्षण करत, अशा चाचण्यांचे परिणाम लक्षात घेणे आवश्यक आहे.” असा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आर. एम. जोशी यांच्या खंडपीठाने नुकताच दिला आहे. या प्रकरणात एका आईने आपल्या मुलाच्या डीएनए चाचणी करण्याच्या कुटुंब न्यायालयाने दिलेल्या आदेशाला उच्च न्यायालयात एका याचिकेद्वारे आव्हान दिले होते.
Read More
उत्तर प्रदेशातील बस्ती जिल्ह्यातून एका अल्पवयीन मुलावर मदरशाच्या आवारात लैंगिक छळ झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अब्दुल हफीज नावाच्या मौलवीवर मदरशात शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थ्यांसोबत अश्लील कृत्य केल्याचा आरोप आहे. त्याने अल्पवयीन मुलांना प्रायव्हेट पार्ट धुण्यास भाग पाडल्याचा आरोप आहे. मौलवीच्या अत्याचाराला कंटाळून अनेक विद्यार्थी मदरशात जाण्यास नकार देऊ लागले.
मानवी तस्करीच्या भीतीने शुक्रवार, दि. २६ एप्रिल २०२४ उत्तर प्रदेशातील अयोध्येत बसची झडती घेण्यात आली. त्यानंतर या बसमध्ये ९३ अल्पवयीन मुले आढळून आली, ज्यांचे वय ६ ते १४ वर्षे दरम्यान होते. याच बसमधील पाच मौलवींनाही पकडण्यात आले. सर्व मुले बिहारमधील अररिया जिल्ह्यातील रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांना शिकवण्याच्या नावाखाली सहारनपूर जिल्ह्यातील एका मदरशात नेले जात होते. या मदरशांची नोंदणीही करण्यात आली नव्हती.