मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नेटफ्लिक्सचे सहमुख्य कार्यकारी अधिकारी टेड सारंडोस, युनिव्हर्सल म्युझिक ग्रुपचे इंडिया व साउथ एशियाचे चेअरमन व मुख्य कार्यकारी अधिकारी देवराज सान्याल आणि मोशन पिक्चर असोसिएशनचे चेअरमन व मुख्य कार्यकारी अधिकारी चार्ल्स रिवकिन या दिग्गजांची भेट घेऊन माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रातील कौशल्य विकासासंदर्भात तसेच चर्चा केली.
Read More
‘हिट: द फर्स्ट केस’नंतर तब्बल तीन वर्षांनी राजकुमार राव आणि सान्या मल्होत्रा पुन्हा एकदा एकत्र झळकणार आहेत. त्यांच्या आगामी चित्रपटाचे नाव ‘टोस्टर’ असून, हा चित्रपट नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचा टीझर मुंबईतील एका भव्य कार्यक्रमात लाँच करण्यात आला. चित्रपटाचा टीझर यूट्यूबवर ३ जानेवारीला प्रदर्शित करण्यात आला असून, तो प्रेक्षकांना विनोद आणि अनपेक्षित वळणांची झलक देतो. नेटफ्लिक्सने राजकुमार राव आणि सान्या मल्होत्रा यांच्या ‘टोस्टर’ चित्रपटाचा अधिकृत टीझर यूट्यूबवर प्रदर्शि
नेटफ्लिक्सने त्यांच्या आगामी स्पाय थ्रिलर वेब सिरीज ‘सारे जहाँ से अच्छा’ चा पहिला टीझर सोशल मीडियावर शेअर केला आहे. प्रेक्षक या मालिकेबाबत प्रचंड उत्सुक असून, अभिनेता प्रतिक गांधी, क्रितिका कामरा, सनी हिंदुजा, सुहेल नैय्यर, तिलोत्तमा शोम, रजत कपूर आणि अनुप सोनी यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. नेटफ्लिक्सने आपल्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये लिहिले, "इंटेल मिळालं! ‘सारे जहाँ से अच्छा’ ही आता गुपित राहिलेली नाही. हेर येत आहेत! लवकरच फक्त नेटफ्लिक्सवर."
Vijay 69 : आपल्या मरणानंतर जवळच्या व्यक्तींना आपल्याबद्दल दोन शब्द बोलताना हयात असताना आपण कोणकोणत्या क्षेत्रात पारितोषिकं कमावली आहेत किंवा करिअरमध्ये यशाची किती शिखरं गाठली आहेत याचा उल्लेखच नसेल तर आपण काय जीवन जगलो? असा प्रश्न स्वत:ला ६९ व्या वर्षी विचारत एक नवी सुरुवात करणाऱ्या विजय मॅथ्यू यांची कथा ‘विजय ६९’ या चित्रपटात मांडली आहे. नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनी वयाची नवी इनिंग सुरु करणाऱ्या लोकांचे उत्तम प्रतिनिधत्व करत आपल्या वयोवृद्ध पालकांचेही मन समजू
हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर ४० वर्षांपेक्षा अधिक काळ प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत. आणि आता पुन्हा एकदा ते एका वेगळ्या विषयासह नव्या भूमिकेतही प्रेक्षकांसमोर येणार आहेत. ‘विजय 69’ असे या चित्रपटाचे नाव असून चित्रपटाचं कथानक एका ६९ वयाच्या वयोवृद्ध व्यक्तीच्या जीवनावर आधारित असून नवी स्वप्न पाहण्यासाठी आणि ती पुर्ण करण्यासाठी वयोमर्यादा नसते असा संदेश या चित्रपटातून देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
सोशल मिडियाच्या आणि तंत्रज्ञानाच्या आधुनिक काळात बऱ्याच अशक्य गोष्टी शक्य होताना दिसतात. विशेषत: मनोरंजनसृष्टीतील कलाकार जीवंत असूनही त्यांच्या निधनाच्या बातम्या वेगाने पसरताना दिसतात. काही दिवसांपूर्वीच ज्येष्ठ अभिनेत्री नीना कुळकर्णी यांच्या निधनाची खोटी बातमी व्हायरल झाली होती. यावर स्वत: नीना कुळकर्णी यांनी मी जीवंत असल्याचं एका पोस्टद्वारे सांगितलं होतं. अशीच काहीशी घटना अभिनेत्री काजोलसोबत घडली होती.
‘ IC814 – द कंदाहार हायजॅक’ वेबसीरिजप्रकरणी नेटफ्लिक्सने आपली चूक मान्य करून माघार घेतली आहे. वेबसीरीजच्या प्रारंभीच दहशतवाद्यांची खरी नावे दाखविण्याचा निर्णय नेटफ्लिक्सने घेतला आहे.
प्रेक्षकांचा कल चित्रपटांपेक्षा अधिक वेब सीरीजकडे जास्त दिसून येत आहे. ओटीटी माध्यमांवर एकाहून एक दर्जेदार कलाकृती येत असून या यादीत पंचायत ही वेब सीरीज विशेष गाजली. या वेब सीरीजचे तीनही भाग प्रेक्षकांना विशेष आवडले. ‘पंचायत ३’ या वेब सीरीजमध्ये कोणताही मोठा स्टार किंवा लोकप्रिय कलाकार नसूनही या वेबसीरिजने २०२४ मधील most watched Indian show च्या यादीत अव्वल क्रमांक पटकावला आहे.
किरण राव दिग्दर्शित ‘लापता लेडीज’ या चित्रपटाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद लाभला. १ मार्च रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांनी प्रतिसाद दिला असला तरी बॉक्स ऑफिसवर फारशी कमाल करू शकला नव्हता. मात्र, ओटीटीवर प्रदर्शित झाल्यानंतर या चित्रपटाला आणि विषयाला प्रचंड लोकप्रियता मिळाली. आता या चित्रपटाचे विशेष स्क्रिनिंग थेट सर्वोच्च न्यायालयात केले जाणार आहे.
२०२१ रोजी आलेली 'स्क्वीड गेम' ही वेबसीरिज विशेष गाजली होती. एकीकडे संपूर्ण जग महामारीचा सामना करत होतं आणि दुसरीकडे आपलं लक्ष वेधून घेण्यासाठी 'स्क्वीड गेम' या वेबसीरिजने मनोरंजनाचा बूस्टर डोस देण्याचं काम केलं होत. जगभरात या वेब सीरीजचे चाहते आहेत आणि दुसरा सीझन कधी येणार याची ते वाट पाहात होते. आता प्रतीक्षा संपली असून नुकताच 'स्क्वीड गेम 2'चा प्रोमो प्रदर्शित करण्यात आला आहे. विशेष म्हणजे रिलीज कधी होणार याबद्दलही खुलासा करण्यात आला आहे.
नाग अश्विन दिग्दर्शित ‘कल्की २८९८ एडी' चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटाने देशभरात ५१० कोटींच्या पुढे तर जगभरात ८३२ कोटींपेक्षा अधिक कमाई केली आहे. आता या चित्रपटाबद्दल आणखी एक मोटी अपडेट समोर आली असून या चित्रपट लवकरच ओटीटीवर पाहायला मिळणार आहे. नियमांनुसार, कोणताही चित्रपट प्रदर्शित झाल्यानंचर दोन ते तीन महिन्यांनी ओटीटीवर प्रदर्शित केला जातो, पण कल्कीच्या निर्मात्यांनी एका महिन्याच्या आतच चित्रपट ओटीटीवर येणार असल्याचे जाहिर केले आहे.
ओटीटी विश्वातील बदलती समीकरणे लक्षात घेऊन नेटफ्लिक्सने आशिया, युरोप बाजारात अँड फ्री योजना आणण्याचे ठरवले आहे. तसे वृत्त प्रसारमाध्यमांनी दिलेल्या अहवालात नमूद केले आहे.यामध्ये आगामी काळात प्रेक्षकांना नेटफ्लिक्स ग्राहकांना विनामूल्य बघता येणार आहे. मात्र यामध्ये जाहिरातीचा भरणा असणार आहे. प्रसारमाध्यमांनी म्हटल्याप्रमाणे कंपनीने या क्षेत्रातील बाजारांचा अभ्यास करत हे मोठे पाऊल उचलले आहे.
दिग्दर्शक संजय लीला भन्साळींच्या 'हीरामंडी : द डायमंड बाजार' या सीरिजची सध्या सगळीकडेच चर्चा आहे. कथानकावर जरी काहींनी टीका केली पण भव्य सेट, आकर्षक कॉस्च्युम, सुंदर गाणी, डायलॉग्समुळे ही सीरिज प्रेक्षकांच्या पसंतीस देखील पडली. आता हीरामंडी या वेब सीरीजचा दुसरा सीझन येणार असल्याची अधिकृत घोषणा नेटफ्लिक्सने केली आहे.
आयआयटी-जेईई आणि एनईईटी परीक्षांची तयारी करत असणाऱ्या विद्यार्थ्यांची खरी कहाणी दाखवणारी कोटा फॅक्टरी ही वेब सीरीज आता तिसरा सीझन घेऊन येत आहे. नुकतीच त्यांनी प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे. या सीरिजचा पहिला सीझन २०१९ मध्ये युट्यूबवर आला होता. त्यानंतर या सीरिजची लोकप्रियता लक्षात घेऊन नेटफ्लिक्सने या सीरिजचा दुसरा सीझन प्रदर्शित केला होता. आणि आता या सीरिजचा तिसरा सीझन प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज आहे.
लोकप्रिय कार्यक्रम 'द कपिल शर्मा' शो मध्ये काम मिळवून देतो असं खोटं सांगून एका महिलेवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नालासोपाऱ्यात ही घटना घडली असून तुळींज पोलिस ठाण्यात आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या घटनेमुळे मनोरंजनसृष्टी हादरली आहे. सध्या नेटफ्लिक्स या ओटीटी वाहिनीवर द कपिल शर्मा शो सुरु असून यात अनेक हिंदीतील कलाकार येत असतात.
‘धोबी घाट’ या २०१० मध्ये चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळल्यानंतर ‘लापता लेडीज’ (Lapata Ladies) चित्रपटाच्या माध्यमातून पुन्हा एकदा दिग्दर्शकाच्या खुर्चीत बसलेल्या किरण रावचा हा चित्रपट आता ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाचा (Lapata Ladies) विषय हा फार वेगळा असून यात कोणताही मोठा सुपरस्टार कलाकार प्रमुख भूमिकेत नसूनही हा चित्रपच बॉक्स ऑफिसवर बऱ्यापैकी तग धरु शकला.
शिवडी ते हिंदी चित्रपटसृष्टी असा प्रवास करणारा मराठमोळा अभिनेता सिद्धार्थ जाधव त्याच्या उत्कृष्ट अभिनय आणि विनोदाच्या टायमिंगमुळे चाहत्यांचा आवडता आहे. अगदी दिग्दर्शक रोहित शेट्टीलाही आपली दखल घ्यायला लावणाऱ्या सिद्धार्थ जाधवला चक्क ‘सेक्रेड गेम्स’ (Sacred Games) या वेब सिरीजची ऑफर आली होती. याचा किस्सा सिद्धार्थ कननला दिलेल्या मुलाखतीत त्याने केला. प्रेक्षकांच्या पसंतीस आलेल्या ‘सेक्रेड गेम्स’ (Sacred Games) ही वेब सीरीज सिद्धार्थने अपमान झाल्यामुळे नाकारली होती.
ओटीटी प्रेमींसाठी दुःखद बातमी आली आहे. डिस्नेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बॉब आयगर यांनी नेटफ्लिक्स प्रमाणेच पासवर्ड शेअरवर बंदी आणण्याचे ठरवले असल्याचे सांगितले आहे. कंपनीच्या महसूलात व सबस्क्रिप्शनममध्ये वाढवण्यासाठी हा धोरणात्मक निर्णय कंपनीने घेतले असल्याचे बॉब आयगर यांनी सांगितले आहे.
करोना काळानंतर प्रेक्षक ओटीटीकडे अधिक वळला. त्याचे एक महत्वाचे कारण म्हणजे ओटीटीवर घरबसल्या प्रेक्षकांना जगभरातील आशय विविध भाषांमध्ये पाहायला मिळतो. सध्या कार्यरत असणाऱ्या अनेक ओटीची वाहिन्यांपैकी नेटफ्लिक्स वाहिनी अधिक प्रेक्षकांना भावते. त्यामुळे प्रेक्षकांसाठी नेटफ्लिक्सने (Netflix) कंबर कसली आहे. खास भारतीय प्रेक्षकांसाठी नेटफ्लिक्सने आगामी चित्रपट आणि वेब सीरिजच्या यादीची घोषणा केली आहे. नेटफ्लिक्सने २९ फेब्रुवारी रोजी तब्बल १९ नव्या प्रोजेक्टची घोषणा केली आहे. यापैकी काही चित्रपट, वेब सीरिज रिलीजच्या
'दम लगा के हैशा' या २०१५ साली आलेल्या हिंदी चित्रपटातून अभिनय कारकिर्दीची सुरुवात अभिनेत्री भूमी पेडणेकर हिने केली. पुढे विविधांगी भूमिका चित्रपट. वेब सीरीजमधून साकारत तिने तिचा चाहतावर्ग तयार केला. तिचा भक्षक हा चित्रपट नेटफ्लिक्स या ओटीटी वाहिनीवर वर गाजत आहे. ज्यात तिने एका सक्षम पत्रकाराचे प्रतिनिधीत्व अतिशय उत्तम केले आहे. भक्षक या तिच्या वेब सीरीजमधील तिच्या भूमिकेचे कौतुक देशभरातच नाही तर अगदी जागतिक पातळीवरही केले जात आहे.
देशात २०१५ साली झालेल्या शीना बोरा हत्याकांडामुळे हाहाकार माजला होता. आपल्या पोटच्याच मुलीची हत्या केल्याचा गंभीर आरोप इंद्राणी मुखर्जीवर करण्यात आळा होता. आता याच सत्यघटनेवर आधारित डॉक्युमेंट्री वेब मालिका नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. 'द इंद्राणी मुखर्जी स्टोरी : बरीड ट्रुथ' असे या वेब मालिकेचे नाव असून या मालिकेचे पोस्टर समोर आले आहे. शीना बोरा हत्याकांडावर भाष्य करणाऱ्या या वेब मालिकेचे चार सीझन भेटीला येणार आहेत.
नेटफ्लिक्सवर प्रसारित होणाऱ्या ‘अन्नपुर्णी’ या दाक्षिणात्य चित्रपटात प्रभू श्रीराम यांच्याबद्दल केलेले आक्षेपार्ह वक्तव्य चित्रपटाच्या दिग्दर्शक, निर्माते आणि कलाकारांना महागात पडले आहे. या चित्रपटात प्रभू श्रीराम मांसाहार करत होते असा संवाद असून यावरुन वादंग निर्माण झाला आहे. देशातील समस्त हिंदु वर्गाच्या भावना यातून दुखावल्या गेल्या असा आरोप करत विश्व हिंदु परिषदेच्या सदस्यांनी नेटफ्लिक्स या ओटीटी वाहिनीच्या मुंबईतील कार्यालयाबाहेर निदर्शने करत नेटफ्लिक्सवरुन चित्रपट काढण्याची मागणी केली आहे.
लाखो राम भक्तांच्या भावना दुखावणारा आणि लव्ह जिहादला प्रोत्साहन देणारा 'अन्नपुर्णी' चित्रपट अखेर नेटफ्लिक्सवरुन हटवण्यात आला आहे. निलेश क्रिष्णा यांनी दिग्दर्शित केलेल्या आणि जतीन सेठी, आर रवीद्र, पुनीत गोयंका (झी एंन्टरटेंमेंन्ट) यांनी निर्मिती केलेल्या या चित्रपटात हिंदुंच्या भावना दुखावल्याचा आरोप करण्यात आला होता. दरम्यान, या प्रकरणी विश्व हिंदु परिषदेच्या सदस्यांनी नेटफ्लिक्सच्या मुंबईतील कार्यालयाबाहेर आंदोलन करत लवकरात लवकर हा चित्रपट नेटफ्लिक्सवरुन हटवण्यात यावा अशी मागनी केली होती. आणि काही वेळानंत
नव्या वर्षाचे स्वागत सगळ्यांनी फार जल्लोषात केले. याच जोषात मनोरंजनसृष्टी रसिक प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाली आहे. २०२४ या नव्या वर्षात अनेक मराठी, हिंदी, दाक्षिणात्य चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. याशिवाय ओटीटी वाहिनींवर देखील अनेक मालिका, चित्रपट देखील प्रदर्शित होणार आहेत. जाणून घेऊयात ओटीटीवर नवीन वर्षात प्रेक्षकांसाठी जानेवारी महिन्यात आशयांची मेजवानी काय असणार आहे.
सध्या सत्य घटनांवर आधारित अनेक चित्रपट आणि वेब मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस येत आहेत. नुकतीच नेटफ्लिक्स या ओटीटी वाहिनीवर प्रदर्शित झालेली 'द रेल्वे मॅन' ही वेब मालिका केवळ भारतातच नाही तर जगभरात ट्रेडिंगमध्ये आहे. जगातील ३६ देशांमध्ये ही वेब मालिका पाहिली जात असून या मालिकेला उदंड प्रतिसाद लाभत आहे. भोपाळ गॅस दुर्घटनेवर बेतलेल्या 'द रेल्वे मेन' या अस्वस्थ करणाऱ्या वेब मालिकेने जगभरात डंका वाजवला आहे.
विनोदवीर कपिल शर्मा आणि सुनील ग्रोव्हर यांच्या जोडीने हिंदीत अनेक हिट शो करत एक काळ गाजवला आहे. मात्र, काही कारणास्तव कॉमेडी नाईट्स विथ कपिल या शोमधून सुनील ग्रोव्हर यांनी माघार घेत कपिल सोबत काम करणे बंद केले होते. मात्र, त्यांच्यातील मतभेद आणि दुरावा संपला असून पुन्हा एकदा कपिल आणि सुनील यांची जोडी एकत्रित येत प्रेक्षकांना खळखळून हसवण्यास सज्ज झाली आहे. नेटफ्लिक्स या ओटीटी वाहिनीवर आगामी सुरु होणाऱ्या कॉमेडी शोमध्ये कपिल शर्मा आणि सुनिल ग्रोव्हर एकत्रित दिसणार असून याची झलक समोर आली आहे.
सध्या प्रेक्षक ओटीटी वाहिनीवरील आशयांकडे अधिक पसंती देताना दिसत आहेत. त्यातच नेटफ्लिक्सवरील मनी हाईस्ट या मुळ स्पॅनिश भाषेतील वेब मालिकेने तर जगभरातील प्रत्येक वयोगटातील प्रेक्षकांना अक्षरश: वेडे केले होते. आतापर्यंत या मालिकेचे ५ भाग प्रदर्शित झाले आहेत. स्वत:कडे गमावण्यासाठी काहीच नसलेला एक प्रोफेसर वेगवेगळ्या क्षेत्रातील आठ जणांना एकत्र आणून चोरीचा मोठा प्लॅन आखतो. या लक्षवेधी चोरीने अगदी शेवटच्या क्षणापर्यंत प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करुन ठेवले होते.
‘कोरोना’नंतर सामान्य माणसांच्या मनोरंजनाच्या व्याख्या बदलून गेल्या. ‘ओटीटी’ने घरबसल्या प्रेक्षकांना विविध भाषांच्या आशयाची मेजवानी एकाच ताटात वाढून दिली. परिणामी, मराठी भाषेचा प्रेक्षकवर्गही विभागला गेला. पण, एकीकडे मराठी चित्रपटांना प्रेक्षक येत नाहीत, ही ओरड सुरू असताना इतर भाषिक चित्रपटांमुळे बर्याचदा मराठी प्रेक्षकांना प्रदर्शनाच्या तारखांमध्ये माघार घ्यावी लागल्याचेही दिसते. ‘द केरला स्टोरी’, ‘जवान’, ‘टायगर ३’ अशा मोठ्या हिंदी चित्रपटांचा फटका मराठी चित्रपटांना यापूर्वीदेखील बसला आहे. तेव्हा, अशाच काह
केंद्र सरकारने आता ओटीटी प्लॅटफॉर्मचे नियमन करण्यासाठी नवीन प्रसारण कायदा प्रस्तावित केला आहे. या कायद्याद्वारे नेटफ्लिक्स, डिस्नेप्लस हॉटस्टार आणि अॅमेझॉन प्राईमसारख्या स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मचे नियमण करण्याची जबाबदारी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडे देण्यात आली आहे.
आंतरराष्ट्रीय एमी पुरस्कार २०२३ ची नामांकने अखेर जाहिर झाली आहेत. महत्वाची बाब म्हणजे या नामांकनांच्या यादीत हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक कलकारांची वर्णी लागली आहे. या यादीत २० देशांतील ५६ नामांकित लोकांचा १४ विविध श्रेणीत समावेश करण्यात आला आहे. यात भारतातून शेफाली शाह, जिम सरभ आणि वीर दास यांच्या नावाचा समावेश असून ‘दिल्ली क्राइम २’ या वेब मालिकेसाठी शेफाली शाह हिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्री या श्रेणीत नामांकन मिळाले आहे.
करोना काळानंतर ओटीटी वाहिनीला प्रेक्षकांनी अधिक पसंती देण्यास सुरुवात केली. नेटफ्लिक्स या ओटीटी वाहिनीने जगातील विविध भाषांमधील आशय प्रेक्षकांना घरबसल्या पाहण्यास मिळत आहे. ओटीटी वाहिनीच्या जंजाळात नेटफ्लिक्स वाहिनीने उच्च दर्जा गाठला असून दुसरीकडे गेली अनेक वर्ष विविध विषयांवर आधारित सुपरहिट चित्रपट प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी यशराज फिल्म्स देत आहे. आता हा मनोरंजनाचा धमाका दुप्पट होणार असून यशराज आणि नेटफ्लिक्स यांच्यात मल्टीपल प्रोजेक्ट्सचा करार झाला आहे.
हिंदी चित्रपटसृष्टीचा एक काळ गाजवलेल्या प्रत्येक अभिनेत्रींनी सध्या ओटीटीची वाट धरल्याचे दिसून येते. अभिनेत्री करीना कपूर खान हिने नेटफ्लिक्स या ओटीटी वाहिनीवर पदार्पण केले असून सुजॉय घोष यांच्या 'जाने जा' या चित्रपटाच्या निमित्ताने ती डिजिटल डेब्यूसाठी सज्ज झाली आहे. कहाणी, बदला अशा प्रकारच्या थ्रिलर गोष्टी आपल्या चित्रपटातून मांडणारे दिग्दर्शक चित्रपटांचे दिग्दर्शक सुजॉय घोष यांनी 'जाने जा' या चित्रपटाच प्रेमाची वेगळी परिभाषा मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
‘बरेली की बर्फी’ या हृदयस्पर्शी चित्रपटाला ६ वर्ष पूर्ण झाली असून या चित्रपटाने सगळ्यांची मन जिंकून घेतली आणि एक उत्तम सिनेमॅटिक अनुभव प्रेक्षकांना दिला.या चित्रपटाची जादू कायम आहे आणि राजकुमार राव यांचा एक मुख्य भाग आहे. या चित्रपटातील राजकुमार रावची भूमिका अभिनयात मास्टरक्लास होती. प्रीतम विद्रोही या व्यक्तिरेखेमध्ये स्वतःला भिडवण्याची त्यांची क्षमता प्रत्येक फ्रेममध्ये दिसून आली. त्याने केवळ भूमिकाच केल्या नाहीत; त्याने त्यात जीव फुंकला आहे.
रिलायन्स इंडस्ट्रीज समुहातील जिओ कंपनीने आता पोस्टपेड बरोबर प्रीपेड ग्राहकांसाठी नेटफ्लिक्स सबस्क्रिप्शन लाँच केल्याचे कंपनीने प्रसिद्धीपत्रकात म्हणले आहे. गेल्या ४-५ वर्षात स्वस्त दरात ४ जी नेटा उपलब्ध करून जनसामान्यात धुमाकूळ घातला होता. त्याचाच पुढचा भाग म्हणून ही स्कीम ग्राहकांसाठी कंपनीने उपलब्ध करून दिली आहे.
वाढत्या तंत्रज्ञानाच्या आवाक्यामुळे डिजिटल क्षेत्रात अनेक नवनवीन संधी तरुणाईला उपलब्ध होत आहेत. त्यातच चित्रपट, वेबसीरीज, यांसारख्या प्रकारांना ओटीटीमुळे नवा प्लॅटफॉर्म मिळाला आहे. त्यामुळे ओटीटीच्या उपलब्धतेमुळे सबटायटल रायटर्संना प्रचंड मागणी बाजारात निर्माण झाली आहे. दरम्यान. या संधीकरिता आवश्यक स्किल्स अंगी असणं अत्यावश्यक आहे. पोस्ट प्रोडक्शन हाऊसमध्ये सध्या सबटायटल रायटर्सची गरज निर्माण झाली आहे.
हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनय कौशल्याने प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण करणाऱ्या राजकुमार राव याची आगामी वेब मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. राजकुमारच्या ‘गन्स अँड गुलाब्स’ या चित्रपटाची गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरु होतीच. आता या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. राज आणि डीके दिग्दर्शित या आगामी कॉमेडी थ्रिलरसाठी चाहते उत्सुक आहेत. दुलकर सलमान, आदर्श गौरव आणि गुलशन सोबत राजकुमार राव अशी कलाकारांची फौज हा चित्रपटात झळकणार आहे.
करोना काळात लोकप्रिय झालेल्या अनेक ओटीटी माध्यमांपैकी नेटफ्लिक्स हे माध्यम अधिक पसंतीचे ठरले. या माध्यमाने भारतात सर्वाधिक लोकप्रियता मिळवली. दर्जेदार आशयांच्या वेब मालिका आणि चित्रपटांमुळे प्रेक्षकांनी नेटफ्लिक्सला अधिक पसंती दिली. परंतु नेटफ्लिक्सचे सबस्क्रिप्शन महाग असल्यामुळे कित्येक जण पासवर्ड शेअर करुन एकच अकाउंट अनेक जणांमध्ये वापरतात. मात्र आता यावर बंधन येणार आहे. तसे, आदेश जारी करण्यात आले आहेत.
ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रसारित होणाऱ्या अश्लील आणि हिंसक सामग्रीचे पुनरावलोकन करण्याचे निर्देश लवकरच दिले जाण्याची शक्यता आहे. सध्या ओटीटी प्लॅटफॉर्म हे लोकप्रिय झाले असून भारतात नेटफ्लिक्स, प्राईम व्हिडीओ, डिस्ने हॉटस्टार आणि अन्य बरेच ओटीटी प्लॅटफॉर्म वापरात आहेत. यावर प्रसारित होणाऱ्या सामग्रीविषयी अनेकदा वाद निर्माण होत असतात. त्या पार्श्वभूमीवर केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालय महत्त्वाचा निर्णय घेणार असल्याचे समजते.
‘लगान’, ‘स्वदेश’, ‘पानीपत’, ‘जोधा अकबर’ सारखे ब्लॉकबस्टर चित्रपट देणारे दिग्दर्शक आशितोष गोवारीकर आता ओटीटी माध्यमावर पदार्पण करणार आहेत. सध्या ओटीटी वाहिनीवर अनेक जुने-जाणते कलाकार पदार्पण करत आहेत. आता यात आणखी एका दिग्दर्शकाची भर झाली आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेते आशुतोष गोवारीकर मात्र यावेळी दिग्दर्शक किंवा निर्माते म्हणून नाही तर भिनेते म्हणून ओटीटी वाहिनीवप झळकणार आहेत.
लालसिंग चड्ढाला चित्रपटगृहांमध्ये प्रेक्षक आणि ओटीटीवर खरेदीदार मिळत नव्हते. परंतु आता त्याचे निर्माते आणि आमीर खान यांच्या अडचणी कमी झाल्या असाव्यात.
नुकताच तिच्या आगामी सिनेमा 'डार्लिंग्ज'चा पहिला टीझर रिलीज करण्यात आला आहे. नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणाऱ्या या सिनेमाच्या माध्यमातून आलिया निर्माती म्हणून पहिल्यांदाच सर्वांसमोर येणार आहे
मल्टिप्लेक्स उद्योगात मोठे नाव असणाऱ्या पीव्हीआर आणि आयनॉक्स यांनी विलनीकरणाची घोषणा केली आहे
व्हीडिओ कंटेंट निर्मात्या नेटफ्लिक्सचा भारतातील व्यावसायवृद्धीबद्दल चिंता व्यक्त केली आहे. कंपनीने याचे खापर टिव्ही केबल ऑपरेटर्सवर फोडले आहे.
गतवर्षी नोव्हेंबरच्या सुरुवातीला ‘नेटफ्लिक्स’ या ओटीटी प्लॅटफॉर्मला ऑस्ट्रेलियन गुप्तचर मालिका ‘पाईन गॅप’चे दोन भाग काढून टाकावे लागले. फिलिपिन्स आणि व्हिएतनामने या गुप्तहेर मालिकेच्या दोन भागांवर आक्षेप घेतला. या मालिकेमध्ये दक्षिण चीन समुद्राचा जो नकाशा वापरण्यात आला होता, त्यात ‘नाईन डॅश लाईन’दाखविण्यात आली होती. ‘नाईन डॅश लाईन’ ही सीमारेषा आहे, ज्याद्वारे चीन संपूर्ण दक्षिण चीन सागरी क्षेत्रावर आपला दावा सांगत आहे. मात्र, या क्षेत्रातील इतर देश ते स्वीकारत नाहीत. दक्षिण चीन समुद्राचा संपूर्ण वाद या ‘नाई
डिजिटल जमान्यात तुम्हाला अगदी फिट अॅण्ड फाईन ठेवणारे स्मार्टवॉचचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. काटे असणारी घड्याळं आता कालबाह्य होतील की काय, अशीही शक्यता व्यक्त केली जात आहे. कोरोना महामारीच्या मानसिक तणावातून मुक्त करण्यासाठी लंडनमध्ये 'नोवॉच' कंपनीने अनोखे स्मार्टवॉच तयार केले आहे. मानसिक तणावाबद्दलची माहिती वेळेपूर्वीच आपल्याला मिळणार असल्याने त्यावर उपाय करणेही शक्य होणार आहे.
अभिनेत्री अमृता सुभाषच्या नेटफ्लिक्सवरील 'बॉम्बे बेगम' या वेब सिरीजमधील भूमिकेची घेतली आंतरराष्ट्रीय दखल
‘रझा अकादमी’च्या नेतृत्वाखाली काही वर्षांपूर्वी मुंबईत रोहिंग्यांच्या समर्थनार्थ काढण्यात आलेल्या मोर्चांच्यावेळी हुतात्मा स्मारकाची मोडतोड करण्यात आली होती. महिला पोलिसांचा विनयभंग करण्याच्या घटना घडल्या होत्या. त्याच ‘रझा अकादमी’ने आता आपला मोर्चा ‘नेटफ्लिक्स’ आणि मणिरत्नम याच्या ‘नवरस’ या वेबसीरिजकडे वळविला आहे.
नेटफ्लिक्स - अॅमेझॉनला टक्कर देतायत प्रादेशिक भाषिक ओटीटी
नेटफ्लिक्स, अमेझॉन प्राईमसह सर्व ‘व्हिडिओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म्स’ माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अखत्यारीत आणण्याचा महत्त्वाचा निर्णय केंद्र सरकारने नोव्हेंबर २०२०च्या उत्तरार्धात घेतला, तेव्हापासून ‘अभिव्यक्तिस्वातंत्र्यावर घाला आला’ असे तीव्र विरोधाचे सूर माध्यम-विश्वात इथून-तिथून ऐकायला मिळत आहेत. परंतु, आयत्या मिळालेल्या स्वातंत्र्याचा वापर व्यापक समाजहित लक्षात घेऊन करण्याइतपत सर्वच प्रसारमाध्यमे खरोखर प्रगल्भ असतात का? आता माध्यमांचे नियमन करताना ‘सेन्सॉर बोर्ड’सह सर्वच विद्यमान यंत्रणांच्या नियमाव
"अफवांवर विश्वास ठेऊ नका, फक्त माझ्यावर ठेवा" असे आपल्या चाहत्यांना आवाहन करत विनोदी अभिनेता कपिल शर्मा याने आपली 'नेटफ्लिक्स एंट्री' घोषित केली. गेले अनेक दिवस छोट्या पडद्यावर दिसणारा कपिल शर्मा आता नेटफ्लिक्सवर येणार म्हटल्यावर तर चाहत्यांच्या आनंदाला उधाणच आले आहे. कपिलच्या या नव्या प्रवासाला चाहत्यांनी भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत.