केरळमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांवर प्राणघातक हल्ले करण्याचा आरोप असलेल्या पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या संघटनेवर बंदी घालण्याची मागणी आज एका निवेदनाद्वारे सूफी उलेमांच्या संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. आज केंद्रीय गृह मंत्री राजनाथ सिंह यांच्या निवासस्थानी जाऊन आपले निवेदन देणार असल्याची माहिती सकाळी ‘ऑल इंडिया तंज़ीम उलेमा ए इस्लाम’ या सूफी संघटनेचे संस्थापक-अध्यक्ष मुफ्ती अशफाक हुसैन कादरी यांनी दिली होती.
Read More