आगामी मुंबई महानगरपालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षाने कंबर कसली असून त्यादृष्टीने प्रयत्न सुरु केले आहेत. बुधवार, २१ मे रोजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विविध राजकीय पक्षांतून शिवसेनेत प्रवेश केलेल्या मुंबईतील माजी नगरसेवकांसोबत संवाद साधला.
Read More
सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर राज्यात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका होण्याची शक्यता आहे. मात्र, त्याआधीच उद्धव ठाकरेंना मोठा दणका बसला आहे. मुंबई महापालिकेच्या निवडणूका जुन्या प्रभाग रचनेनुसारच होणार असल्याची माहिती पुढे आली आहे.
( feed pigeons you will be fined Rs 500 BMC Mumbai ) मुंबईत दादर, फोर्ट, माटुंगा अशा ठिकाणी अनेक वर्षांपासून जुने कबुतरखाने आहेत. या बरोबर मु्ंबईच्या उपनगर परीसरातदेखील कबुतरांना खाणे देण्यात येते. यामुळे मुंबईतील रहीवाशी परीसरात मोठ्या प्रमाणात कबूतरे आढळून येतात. कबूतरांनमुळे होणार्या ञासांवर आता उपाय म्हणून मुंबई महापालिकेने ५०० रुपये दंड आकारण्याचा निर्णय घेतला आहे.
अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांचे निर्देश
बहुप्रतीक्षित मुंबई महापालिका निवडणूक जाहीर होण्याआधीच महायुतीने उद्धव ठाकरेंना दणका देण्याची तयारी सुरू केली आहे. २०१७ साली प्रभाग आरक्षण लागू केल्यानंतर, पुढील १० वर्षे ते कायम ठेवण्याचा ठराव मुंबई पालिका सभागृहात मंजूर करण्यात आला होता. त्याचा आधार घेत येत्या निवडणुकीतही हाच नियम लागू करण्याबाबत महायुतीने निवडणूक आयोगाकडे पाठपुरावा सुरू केल्याची माहिती अंतर्गत सूत्रांनी दिली.
(Eknath Shinde) विधानसभा निवडणुकीतील यशानंतर महायुतीनं आगामी बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकीवर लक्ष्य केंद्रित केले आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेच्या मुंबईतील सर्व खासदार, आमदार आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांची विशेष बैठक गुरुवार दि. १२ डिसेंबर रोजी पक्षाचे नेते दीपक केसरकर यांच्या मुंबईतील शासकीय निवासस्थानी रामटेक बंगल्यावर पार पडली.
महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणूकपूर्वी नीती आयोगाने महाराष्ट्र सरकारला मुंबई महानगर क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासंबंधीचा सविस्तर अहवाल सादर केला होता. सदर अहवालावर मुख्यमंत्रिपदी विराजमान होताच देवेंद्र फडणवीसांनी कामही सुरु केल्याचे संकेत मिळाले आहेत. ‘म्हाडा’चे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांच्या नेतृत्वात नुकतीच एक कार्यशाळा संपन्न झाली. त्याअंतर्गत मुंबई महानगरात 2030 पर्यंत 30 लाख परवडणार्या घरांच्या निर्मितीचे उद्दिष्ट निर्धारित करण्यात आले आहे. त्यानिमित्ताने या परवडणार्या घ
मुंबई : लोअर परळ परिसरातील १,४५० मिलीमीटर व्यासाची तानसा मुख्य जलवाहिनी दुरूस्तीचे काम गुरूवार दिनांक २८ नोव्हेंबर २०२४ रोजी रात्री १० वाजेपासून शुक्रवार दिनांक २९ नोव्हेंबर २०२४ रोजी रात्री ८ वाजेदरम्यान हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे या २२ तासांच्या कालावधीत जी दक्षिण आणि जी उत्तर विभागातील काही परिसरांचा पाणीपुरवठा ( water supply ) पूर्णत: तर काही ठिकाणी अंशत: बंद राहणार आहे.
दाटीवाटीने वसलेल्या झोपडपट्टयांसह २४ तास पाणीपुरवठ्याचे आश्वासन मुंबईकरांना पालिकेत २५ वर्षांहून अधिक काळ सत्ता उपभोगलेल्या पक्षाकडून आणि प्रशासनाकडून वारंवार देण्यात आले. त्यासाठी ‘सुजल मुंबई अभियाना’चा घाटही घालण्यात आला. पण, दुर्दैवाने त्याची आजतागायत अंमलबजावणी झालेली नाही. त्यानिमित्ताने मुंबईच्या तोंडचे पाणी पळवणारे नेमके कोण? आणि मुंबईच्या पाणीटंचाईच्या समस्येवरील उपाययोजना यांचा उहापोह करणारा हा लेख...
बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील विविध विकासकामांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण आणि भूमिपूजन गुरुवार, दिनांक १० ऑक्टोबर २०२४ रोजी दुपारी १२.३० वाजता, चर्नी मार्ग येथील नियोजित मराठी भाषा भवन परिसरात करण्यात येणार होते.
मुंबईतील चेंबूर परिसरात लागलेल्या भीषण आगीत सात जणांचा मृत्यू झाला. परिसरातील सिध्दार्थ कॉलनीत दुमजली घराला आगीत एकाच कुंटुंबातील ७ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या अग्निशमन दलाला ही आग विझविण्यात यश आले असून या ठिकाणी कुलिंग ऑपरेशन सुरू आहे. अग्निशमन दलाकडून आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.
यंदा रिअल इस्टेट क्षेत्रातील संस्थात्मक गुंतवणूक वाढतच असून तिसऱ्या तिमाहीत मोठी वाढ नोंदविण्यात आली आहे. चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत ४५ टक्क्यांच्या वाढीसह रिअल इस्टेट क्षेत्रातील कार्यालय मागणीही विक्रमी पातळीवर पोहोचली आहे. या तिमाहीत एकूण संस्थात्मक गुंतवणुकीपैकी निम्म्याहून अधिक गुंतवणूक कार्यालयासाठी होती.
मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या नायर रुग्णालयातील लैंगिक छळवणुकीच्या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे.
भारत सरकारने जाहीर केलेल्या ‘स्वच्छता ही सेवा’ २०२४ उपक्रमांतर्गत बँक ऑफ बडोदातर्फे देशभरात स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले.
(Dharavi Land Jihad) धारावीतील ९० फूट रस्त्यावरील सुभानिया मशिदीचे अतिक्रमित बांधकाम काढण्यासाठी दि. २१ सप्टेंबर रोजी सकाळी पालिकेचे पथक त्याठिकाणी पोहोचले होते. २५ वर्ष जुन्या या सुभानिया मशिदीचे अनधिकृत बांधकाम पाडू नये यासाठी संतप्त झालेल्या स्थानिक नागरिकांनी पालिकेच्या पथकाला रोखले. पालिकेच्या वाहनाच्या काचांची तोडफोड केली. पालिकेच्या पथकाचा रस्ता अडवण्यात आला. इतक्या मोठ्या संख्येने जमाव अचानक जमा झाल्याने आधीच मशिदीच्या नावे फतवे काढण्यात आल्याचाही आरोप करण्यात आला आहे. ज्यामुळे धारावीतील लँड जिहादचे
(Mangal Prabhat Lodha) मुंबई महापालिकेद्वारे दि. २१ रोजी सायन धारावी परिसरातील एका प्रार्थनास्थळाचा अनधिकृत भाग तोडण्यासाठी मोहीम हाती घेण्यात आली होती. सकाळी महापालिकेच्या जी नॉर्थ प्रभागाचे अधिकारी या रस्त्यावर पोहोचले. यावेळी काही कट्टरपंथीयांनी प्रशासनाच्या कामात अडथळा आणण्यास सुरुवात केली. पोलीस आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर दगडफेक सुद्धा करण्यात आली. यामध्ये महापालिकेच्या बसेसचे नुकसान देखील झाले. सदर तणावपूर्ण परिस्थिती नियंत्रणात रहावी यासाठी मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी
मुंबईत अनेक ठिकाणी गणेशोत्सवात मंडळांचे देखावे, गणरायाच्या मूर्ती पाहण्यासाठी देश-विदेशातील गणेशभक्तांची गर्दी होत असते. त्यात दि. १२ सप्टेंबरपासून मुंबई परिसरात गणेशभक्तांची मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळाली.
मुंबईत २९१ ठिकाणी दरड कोसळण्याचा धोका कायम आहे. त्यामध्ये भांडुप, विक्रोळी,घाटकोपर, चेंबूर, कुर्ला पूर्व, साकीनाका,जोगेश्वरी, मालाड या ठिकाणांचा समावेश आहे. याठिकाणी २२ हजारांहून अधिक रहिवाशांचे वास्तव्य आहे. त्यामुळे रहिवाशांच्या सुरक्षेसाठी पालिका प्रशासनाने संरक्षक भिंत बांधण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान दरड कोसळण्याचा धोका असणाऱ्या ठिकाणी अजूनही २२ हजार ४८३ झोपड्यांपैकी ९ हजार ६५७ झोपड्यांना इतरत्र स्थलांतरित करण्याची शिफारस मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळाने यापूर्वी राज्य सरकारकडे दिली आहे. त्यामुळे त्या
थर्माकोल हे विघटनशील नसल्याने पर्यावरणाला आणि सजीवसृष्टीला अत्यंत धोकादायक आहे. या थर्माकोलचा वापर गणेशोत्सवात सजावटीसाठी केला जातो. मात्र विसर्जनानंतर हेच थर्माकोल नाल्यात किंवा रस्त्यांवर फेकून देण्यात येते. त्यामुळे मुंबई महापालिकेने एका संस्थेमार्फत थर्माकोलच्या सजावटींच्या वस्तुंचे संकलन करून पुनर्प्रक्रिया करण्याता निर्णय घेतला आहे. यासाठी पालिकेने मुंबईत गणेशमूर्ती विसर्जनस्थळी ४८ संकलन केंद्र उभारली आहेत.
मुंबईस्थित उमा कुळकर्णी गेली आठ वर्षे भारतीय सैन्य आणि त्यांच्या परिवारांसाठी विविध उपक्रमांतून सैन्याप्रति आपली कृतज्ञतेची भावना प्रकट करत आहेत. उमाताईंच्या कामाचा आढावा घेणारा लेख
धारावीमध्ये काम करणाऱ्या अनेक स्वयंसेवी संस्थांनी आशियातील सर्वात मोठ्या झोपडपट्टीतील अनौपचारिक भाडेकरूंचा शोध घेण्यासाठी सुरू असलेल्या राज्य सरकारच्या सर्वेक्षणाला पाठिंबा दिला आहे. काही बिगर स्थानिक लोक चुकीची माहिती पसरवून पुनर्विकास रोखण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप या संघटनांनी केला आहे.
केवळ मुंबई, ठाणे, पुणे यांसारखी महानगरेच नव्हे, तर राज्याच्या कानाकोपर्यात झोपडपट्ट्यांची संख्या लक्षणीय वाढली आहे. या बकाल वस्त्या वाढती गुन्हेगारी आणि अनारोग्याच्या परिस्थितीच्या बळी ठरल्या असून, राज्याच्या सर्वांगीण प्रगतीत अडसरच ठरल्या आहेत. तेव्हा, राज्यातील झोपडपट्टी पुनर्विकासाचे भिजत घोंगडे, त्या प्रक्रियेतील आव्हाने आणि त्यावरील उपाययोजना यांचा आढावा घेणारा हा लेख...
मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी पालिकेच्या प्रभाग कार्यालयात ईडी आणि लाचलूचपत प्रतिबंधक कार्यालये सुरु करावीत, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते तथा विशेष कार्यकारी अधिकारी सदानंद साटम यांनी केली आहे. के\ पूर्व प्रभागात झालेल्या लाचप्रकरणानंतर त्यांनी ही मागणी केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, के\ पूर्व प्रभागात गेल्या ५ वर्षात एकूण ३ लाचखोरीच्या घटना घडल्या आहेत.
धारावी पुनर्विकास प्रकल्पाअंतर्गत गेल्या पाच महिण्यात १० हजार घरांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले,तर २१ हजार झोपडपट्टी बांधकामाना प्रत्येकी युनिक नंबर देण्यात आला आहे.
मुंबई महानगरपालिका संचालित मुंबई जिल्हे एड्स नियंत्रण संस्थेमार्फत एचआयव्ही\ एड्स बाबतची जनजागृती करण्यासाठईी रेड रन मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
मुंबईतील बोरिवली पश्चिम येथे एका ३५ वर्षीय मजुराचा मॅनहोलमध्ये पडून नुकताच मृत्यू झाला. या घटनेनंतर पुन्हा एकदा मुंबईतील मृत्यूचे सापळे ठरलेल्या जीवघेण्या मॅनहोलचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मुंबई महानगरपालिकेने मॅनहोलच्या झाकणांची चोरी टाळण्यासाठी स्मार्ट सेन्सर योजना राबविण्याचे निश्चित केले आहे. त्यानिमित्ताने मुंबईतील असुरक्षित मॅनमोल आणि त्यासंदर्भात पालिकेने घ्यावयाची खबरदारी याचा उहापोह करणारा हा लेख...
बेस्ट उपक्रमाअंतर्गत ७७व्या बेस्ट दिनाचे औचित्य साधून ' बेस्ट उपक्रमाचा इतिहास व उपक्रमाची प्रगतीशील कार्यप्रणाली ' याबाबतची सखोल माहिती दर्शविनारे प्रदर्शन दिनांक ७ ऑगस्ट २०२४ ते ११ ऑगस्ट २०२४ पर्यंत सायंकाळी ६ वाजेपर्यंत सुरु राहणार आहे. या प्रदर्शनात बेस्ट बसची प्रतिकृती, दुर्मिळ जुनी तिकिटे, तिकिट वितरण यंत्रे,कर्मचाऱ्यांचे पोशाख, बॅच,दुर्मिळ पंखे मुंबईकरांना पाहता येणार आहेत.
मुंबई महापालिकेने नियुक्त केलेल्या क्लीन अप मार्शलकडून अस्वच्छता पसरवणाऱ्यांविरोधात दंडात्मक कारवाई केली जाते. दरम्यान क्लीन अप मार्शलनी २२ प्रभागात तब्बल १ कोटी २३ लाख रुपयांची वसुली करत ४२ हजार जणांवर कारवाई केली आहे. यातील सर्वाधिक अस्वच्छता पसरवणारे चर्चगेट, सीएसएमटी,दादर, कफ परेड इत्यादी भागात सापडले.
शहर असो वा खेडे, पावसाळा आला की खड्डेयुक्त रस्त्यांच्या समस्येने वाहनचालक, पादचारी आणि एकूणच प्रशासनाच्या नाकीनऊ येतात. आज मुंबई, पुणे, नाशिकसारख्या शहरांची अवस्था याहून वेगळी नाहीच. तेव्हा, पावसाळ्यात दरवर्षी खड्ड्यांत विसर्जित रस्ते, त्यावर सरकारने उचललेली पाऊले आणि उपाययोजना यांचा आढावा घेणारा हा लेख...
राज्यातील ७५ हजार गोविंदांना विम्याचे संरक्षण देण्याचा निर्णय महायुती सरकारने गुरुवार, दि. २५ जुलै रोजी घेतला. दहिहंडी उत्सवामध्ये मानवी मनोरे रचतांना अपघात किंवा दुर्घटना घडून दुर्दैवी मृत्यू आल्यास, २ अवयव किंवा १ डोळा निकामी झाल्यास, किंवा कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास शासनाकडून १० लाख रुपये इतके विम्याचे संरक्षण देण्यात आले आहे.
शंभर वर्षाहुन जुने ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालय कात टाकणार आहे. प्रस्तावित नविन रेल्वे स्थानकासाठी मनोरुग्णालयाची काही जागा रेल्वे आणि ठाणे महापालिकेला विकास कामासाठी देण्याचा निर्णय झाला असला तरी, तब्बल ५६० कोटी खर्चून मनोरुग्णालयाचा कायापालट होणार आहे.
तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्याच मुंबई भेटीत मुंबईकरांना तीन हजार कोटींच्या प्रकल्पाची भेट दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतल्यानंतर शनिवार दि.१३ रोजी ते पहिल्यांदा मुंबईत आले होते. या पहिल्याच दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते २९०० कोटींच्या प्रकल्पांचे लोकापर्ण आणि भूमिपूजन करण्यात आले.
परवाच्या मुंबईतील मुसळधार पावसाने मे महिन्यातील घाटकोपर होर्डिंग्ज दुर्घटनेच्या आठवणी जागृत झाल्या. सुदैवाने या पावसात वादळीवार्यांमुळे होर्डिंग्ज कोसळण्याची बातमी धडकली नसली, तरी अद्याप अनधिकृत होर्डिंग्जचा धोका पूर्णपणे टळलेला नाही. म्हणूनच राज्य सरकारने होर्डिंग्जबाबत निश्चित धोरण आणण्याची घोषणा केली आहे. त्यानिमित्ताने घाटकोपर दुर्घटनेची भीषणता, त्यानंतर झालेली कारवाई आणि याबाबतच्या धोरणाकडून अपेक्षा याची माहिती देणारा हा लेख...
सकाळपासूनच मुंबईत पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे. शहरातल्या बऱ्याच भागात मुसळधार पावसामुळे पाणी साचल्याचे पाहायला मिळाले आहे. या पावसाचा फटका रेल्वे वाहतुकीसह रस्ते वाहतुकीला मोठा फटका बसला आहे. विशेष म्हणजे या मुसळधार पावसात विमानसेवादेखील विस्कळीत झाली आहे.
मुंबईत रविवारी मध्यरात्रीपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली त्यामुळे उकाड्याने हैराण झालेले मुंबईकर सुखावले. पण सकाळी पावसाचा रुद्रावतार, अनेक भागात साचलेले पाणी आणि वाहतूककोंडी, लोकलसेवा ठप्प झालेली पाहून चाकरमान्यांना मात्र पावसामुळे आवड्याच्या पहिल्याच दिवशी हाल सोसावे लागले.
राज्यात नागरी क्षेत्रात मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे संकलन करण्यात येते. प्रत्येक शहरात कचरा निर्मूलनात वाढ झाली असून कचऱ्याचे संकलन वाढले आहे. ओला व सुका कचरा असे वर्गीकरण करण्यात येवून कचरा उचलण्यात येत आहे. राज्यात नागरी क्षेत्रातील घनकचरा व्यवस्थापनाबाबत सर्वंकष धोरण तयार येईल, अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी लक्षवेधी सूचनेच्या उत्तरावेळी दिली.
शहरातील बेडेकर सदन येथील रहिवाशी अभिषेक सबनीस यांनी जगातील सर्वात जुनी व नावलौकिक असलेली कॉमरेड मॅरेथॉन दक्षिण आफ्रिका (८५ कि.मी.) या स्पर्धेत भाग घेऊन आपल्या गिरगावचे नाव गाजवले आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे, सबनीस यांनी प्रथमच या मॅरेथॉनमध्ये भाग घेत निर्धारित वेळेत म्हणजेच ११.५१ तासांमध्ये शर्यत पूर्ण केली आहे.
राज्यात दमदार पावसाला सुरूवात झाली असून कोकण प्रदेशाला पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे. मुंबई महानगर प्रदेशात पावसाची संततधार सुरू असून येत्या दोन-तीन दिवसांत मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. दरम्यान, राज्यात ढगाळ वातावरण असून पुण्यात देखील अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.
वर्सोवा खाडीशेजारी एमएमआरडीए अंतर्गत सुरू असलेल्या पाईपलाईन कामावेळी घडलेल्या दुर्घटनेत जेसीबीसह अडकलेल्या राकेश यादव यांच्या कुटुंबियांना मदतीचा धनादेश सुपूर्द करण्यात आला आहे. दरम्यान, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यादव यांच्या कुटुंबियांना ठाणे येथील निवासस्थानी हा धनादेश देण्यात आला आहे.
म्हाडात अनेक वर्षांपासून दलालराज्य आहे. कित्येक दलालांच जणू मुख्यालयाला विळखाच बसला आहे.घरे देतो म्हणून नागरिकांची फसवणूक करणाऱ्यांची म्हाडाच्या दक्षता विभागाने अत्यंत गंभीर दखल घेतली असून सुरक्षा रक्षकांना या दलालांना चाप लावण्याचे आदेश दिले आहेत.
अमर महल ते वडाळा व पुढे परळ पर्यंतच्या ९.७ किलोमीटर लांबीच्या जल बोगद्याचे खोदकाम 'टीबीएम' संयंत्राद्वारे पूर्ण झाले आहे. या भूमिगत जल बोगदा प्रकल्प अंतर्गत वडाळा ते परळ दरम्यान ५.२५ किलोमीटर लांबीच्या दुसऱया टप्प्याच्या जल बोगद्याचा 'ब्रेक थ्रू' शुक्रवार,दि. २१ जून रोजी महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांच्या हस्ते करण्यात आला. अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरानंतर १०० किलोमीटर जल बोगदे असणारे मुंबई महानगर जगातील दुसरे शहर ठरले आहे.
शहरातील वाढत्या रोहिंग्या आणि बांग्लादेशी लोकांच्या अनधिकृत वास्तव्यामुळे फक्त पोलिसांची नाही, तर आपल्या समाजाची देखील डोकेदुखी वाढली आहे, असे कॅबिनेट मंत्री तथा उपनगर पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी सांगितले.
केंद्रात भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारचा शपथविधी झाला, तरी भाजपचा कसा पराभव झाला आहे, हे विरोधी पक्षनेते अजूनही ठासून सांगत आहेत. स्वतःचीच पाठ थोपटून घेत आहेत. भाजपचा देशभरात जनाधार वाढलेला असतानाही, हा त्याचा पराभव असल्याची अफवा आत्ममग्न विरोधक पसरवत आहेत. या पार्श्वभूमीवर पक्षाचे काम आणि कार्यकर्त्यांच्यावरील अदम्य विश्वास यांच्या जोरावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेला विजयी संकल्प निश्चितच ऊर्जादायी!
वेसावे (वर्सोवा) येथील अनधिकृत बांधकामाविरोधातील मोहीम मुंबई महानगरपालिकेने अधिक तीव्र केली आहे. वेसावे येथील शिव गल्लीमध्ये अनधिकृतपणे बांधकाम सुरू असलेल्या तीन इमारतींचे निष्कासन केल्यानंतर बुधवार, दि.१२ जून रोजी आणखी एका इमारतीवर निष्कासनाची कारवाई करण्यात आली. तळमजला आणि त्यावर दोन मजले असे या इमारतीचे स्वरुप होते.
माटुंगा (पूर्व) परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावरील पदपथ खोदून अज्ञातांनी केबल चोरून नेल्याची घटना काही दिवसांपूर्वी उघडकीस आली. याबाबत प्रकरणाची मुंबई महानगरपालिकेने गंभीर दाखल घेत अनधिकृत खोदकामे आढळल्यास पोलिसात तक्रार दाखल करण्याचे निर्देश महानगरपालिका प्रशासनाकडून सर्व विभागातील सहायक आयुक्तांना देण्यात आले आहेत.
मुंबईतील वेसावे (वर्सोवा) येथे सागरी किनारा क्षेत्र व्यवस्थापन परिसरामध्ये अनधिकृत बांधकामांकडे कानाडोळा करणे, वरिष्ठांनी वारंवार सूचना करूनही त्यांचे निष्कासन न करणे, कामकाजातील इतर नियमित बाबींमध्ये देखील निष्काळजीपणा केल्याप्रकरणी के पश्चिम विभागातील दुय्यम अभियंता सोमेश शिंदे यांना निलंबित करण्यात आले आहे.
मुंबई महानगरपालिकेच्या सर्व प्रशासकीय विभागातील विविध ठिकाणी शनिवार, दि. ८ जून रोजी सखोल स्वच्छता मोहीम (डीप क्लीन ड्राईव्ह) राबविण्यात आली. त्यात, एकाच दिवसात ८५ मेट्रिक टन राडारोडा (डेब्रीज), २५ मेट्रिक टन टाकाऊ मोठ्या वस्तू आणि ६५ मेट्रिक टन कच-याचे संकलन करण्यात आले. तर, ३१६ किलोमीटर लांबीचे रस्ते स्वच्छ करण्यात आले.
मुंबईतील चेंबूर परिसरात गुरुवार दि. ६ रोजी सकाळच्या सुमारास घरगुती सिलेंडरचा स्फोट झाल्याची घटना घडली आहे. या स्फोटानंतर आग लागल्याने या घटनेत दहा जण जखमी झाले असल्याची माहिती समोर आली आहे. ही घटना चेंबूरच्या सी जी गिडवाणी मार्गावरील एका घरात घडली.
मुंबई महानगरपालिका प्रशासनामार्फत पवई येथे करण्यात आलेली अतिक्रमण निर्मूलन कारवाई ही कायदेशीर प्रक्रियेचे पालन करूनच करण्यात येत होती. या हल्ल्यात जखमी महानगरपालिका कर्मचारी तसेच पोलीस कर्मचा-यांची बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी अतिरिक्त पोलिस आयुक्तांसह प्रत्यक्ष ठिकाणास भेट देवून आस्थेवाईकपणे विचारपूस केली. या कारवाईदरम्यान महानगरपालिका कर्मचा-यांवर झालेला हल्ला कदापि सहन केला जाणार नाही. महानगरपालिका प्रशासन कर्मचा-यांच्या पाठिशी ठामपणे उभे आहे, असा विश्वास त्यांनी कर्मचा-या