मराठी चित्रपटसृष्टीत सध्या विविध विषयांवर आधारित चित्रपट येत आहेत. यातील अनेक चित्रपट हे प्रदर्शनापुर्वीच आंतरराष्ट्रीय स्तरावर पुरस्कार मिळवत आहेत. याच यादीतील एका चित्रपटात ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी आणि ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर इच्छा मरण या विषयावर भाष्य करणाऱ्या आता वेळ झाली या चित्रपटात एकत्रित दिसणार आहेत. अनंत नारायण महादेवन दिग्दर्शित, लिखित 'आता वेळ झाली' या चित्रपटाचे पहिले पोस्टर नुकतेच सोशल मीडियावर प्रदर्शित झाले. दरम्यान, या चित्रपटाची कथा ही सत्य घटनेवर आधारित आहे.
Read More