जागतिक तापमान बदलामुळे हिमालयातील हिमनद्या वेगाने वितळत असल्याचे समोर आले आहे. ज्यामुळे आशियातील लाखो लोकांच्या पाणीपुरवठ्याला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. साधारण ४००-७०० वर्षांपूर्वी मोठ्या हिमनद्यांचा शेवटचा विस्तार झाला. तेव्हापासून गेल्या काही दशकांमध्ये हिमनद्या सरासरीपेक्षा दहापट अधिक वेगाने वितळत आहेत. ’सायन्टिफिक रिपोर्ट्स’ या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या या अभ्यासात असेही दिसून आले आहे की, हिमालयातील हिमनद्या जगातील इतर भागांतील हिमनद्यांपेक्षा कितीतरी वेगाने आक्रसत आहेत.
Read More
अंटार्क्टिकामध्ये फ्रान्सपेक्षाही मोठ्या आकाराचा हिमनग वितळल्याची माहिती समोर आल्याने जागतिक स्तरावर चिंता व्यक्त होत आहे. हवामानबदलामुळे जगात हळूहळू मोठे बदल होत आहेत. त्याचा परिणाम अमेरिकेसह जगातील अनेक भागात स्थानिक पातळीवरही दिसत आहे.
जागतिक तापमानवाढीचा फटका आता अंटार्क्टिका खंडाला बसण्यास सुरुवात झाली आहे, हेच या तापमान वृद्धीवरून दिसून येते. जागतिक तापमानवाढ ही एक वैश्विक समस्या असून त्यावर तोडगा हा जगातील सर्वच राष्ट्रांनी मिळून काढणे अभिप्रेत आहे.
जपानने आता ‘आयडब्ल्यूसी’मधून बाहेर पडण्याचा निर्णय घोषित केला आहे.‘आयडब्ल्यूसी’अंतर्गत असलेल्या सर्व देशांनी जपानशी असलेले संबंध सर्व देशांनी तोडावेत, अशी मागणी केली आहे. त्यामुळे जपानला देवच सुबुद्धी देवो, म्हणजे त्यांच्या येणाऱ्या सात पिढ्यांना तरी देवमाशांचे दर्शन होईल.
जागतिक तापमान वाढीबद्दल सगळ्यांनाच वरवर कल्पना आहे. मात्र आजच्या परिस्थितीचा विचार केला असता पृथ्वीवरील प्रत्येक सामान्य माणसाने या जागतिक तापमान वाढीबद्दल जागरूक असणे ही काळाची गरच झाली आहे.