हिंदी चित्रपटसृष्टीसाठी ऑगस्ट महिना खऱ्या अर्थाने सुगीचा गेला असेच म्हणावे लागेल. ११ ऑगस्ट रोजी ‘गदर २’ आणि ‘ओएमजी २’ हे दोन मोठे चित्रपट प्रदर्शित झाले. एकीकडे अभिनेता सनी देओल तर दुसरीकडे अक्षय कुमार. दोन्ही अभिनेत्यांचा चाहता वर्ग हा मोठाच. परंतु यावेळी सनी देओलच्या ‘गदर २’ने बाजी मारली आणि बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली. ‘गदर २’ आणि ‘ओएमजी २’ ज्यावेळेस प्रदर्शित झाले त्यानंतर मोठा विकेंड असल्यामुळे दोन्ही चित्रपटांना प्रेक्षकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली. त्यातही गदर २ चित्रपटाला तर प्रेक्षकांनी इतका प
Read More