(Mumbai Water Shortage Crisis) मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांतील पाणीसाठा वेगाने कमी होत असून सध्या या धरणांत मिळून ३३ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. यातच तापमानवाढीमुळे बाष्पीभवन होऊन धरणांमधील पाणीसाठा वेगाने कमी होत आहे. त्यामुळे मुंबईवर पाणी कपातीचे संकट तयार झाले आहे. पावसाळ्यापर्यंत हा पाणीसाठा पुरेसा नसल्याने मुंबई महापालिका प्रशासनाने तत्पूर्वीच राज्य सरकारकडे राखीव पाणीसाठ्याची मागणी केली आहे.
Read More
पृथ्वीवर पाणी हेच जीवनाचा आधार आहे. या पृथ्वीतलावर कोणत्याही सजीवाला जीवंत राहण्यासाठी पाणी हे अनिवार्यच. परंतु, शेजारी पाकिस्तानात जीवनाच्या या प्रमुख स्रोताबद्दल एक मोठे संकट सध्या उभे ठाकले आहे. पाकिस्तानातील या गहिऱ्या होत चाललेल्या जलसंकटाचा घेतलेला हा आढावा...
पाकिस्तानातील जलसंकटामागे लोकसंख्येची बेसुमार वाढ आणि शहरीकरण ही मुख्य कारणे आहे, तर जलवायू परिवर्तन, खराब जलव्यवस्थापन आणि संकटाशी दोन हात करण्यासाठी आवश्यक असलेल्या राजकीय इच्छाशक्तीचा अभाव या गोष्टींनी हे संकट अधिकच वाढवले.
पाण्याच्या बाबतीत केला जाणारा हलगर्जीपणा आता महागात पडू लागला आहे.
मुंबईकरांची आता दूषित पाण्यापासून सुटका होणार असून, सेंद्रीय प्रक्रियेने दहा मिनिटांत स्वच्छ पाणी मिळणार आहे. मनपाच्या के (पश्चिम)विभागाचे प्रभाग समितीचे अध्यक्ष, भाजपचे नगरसेवक योगीराज दाभाडकर यांनी गटारातील दूषित पाण्यावर प्रक्रिया करून ते स्वच्छ करून दाखवले आहे.
अंधेरी पश्चिमेला श्यामनगर झोपडपट्टी असून येथील रहिवाशांना पालिका प्रशासनाच्या आडमुठेपणामुळे रस्ता, पाणी टंचाई, शौचालयाची कमतरता आदी समस्यांना सामोरे जावे लागत आहे.