(Rahul Gandhi alleges Election Commission) काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले आहेत. यावेळी त्यांनी मतदार यादी पडताळणीतील अनियमिततेबाबत सादरीकरण करत निवडणूक आयोग आणि भाजपवर मतचोरीचा गंभीर आरोप केला आहे. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालापासूनच राहुल गांधी आणि काँग्रेस पक्ष विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांमध्ये हेराफेरी झाल्याचा दावा करत आहेत. यावर निवडणूक आयोगाने त्यांच्या या दाव्यांना निराधार आणि बेजबाबदार म्हटले होते.
Read More
(MLA Kiran Samant) शिवसेना आमदार किरण सामंत यांनी नाव न घेता उबाठा नेते तसेच माजी आमदार राजन साळवी यांच्यावर आरोप केला आहे. निष्ठावंत म्हणणाऱ्यांनी शिंदे यांना गाफील ठेवलं होतं, ठाकरे गटातून शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार होते नंतर माघार घेतली, असा आरोप किरण सामंत यांनी केला आहे.
( Rohit R. R. Patil ) विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसात महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात मोठ्या उलाढाली झाल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान तासगाव-कवठे महाकाळ विधानसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे रोहित आर.आर.पाटील निवडणुकीच्या रिंगणात आहेत. रोहित पाटील हे दिवंगत नेते आर. आर. पाटील यांचे पुत्र आहेत. रोहित पाटील यांच्या विरोधात भाजपमधून अजित पवार गटामध्ये प्रवेश केलेले माजी खासदार संजय पाटील आहेत.
Belapur Vidhansabha : नवी मुंबईतील बहुचर्चित बेलापूर विधानसभेसाठी भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि मनसे अशी तिरंगी लढत पाहायला मिळेल. पाहूया काय आहे या मतदारसंघाचा इतिहास आजच्या व्हिडिओतून.
( Congress ) “विधानसभा निवडणुकीची जबाबदारी काँग्रेसने कर्नाटक आणि तेलंगणामधील नेत्यांवर दिली असून तेथून शेकडो कोटी रुपये महाराष्ट्रात येतील,” अशी खळबळजनक माहिती शिवसेना सचिव किरण पावसकर यांनी बुधवार, दि. २३ ऑक्टोबर रोजी दिली. या दोन्ही राज्यांच्या सीमा सील करण्यासाठी निवडणूक आयोगाला निवेदन देणार असल्याचे ते म्हणाले.
( Ravindra Chavan ) मंत्री रविंद्र चव्हाण यांना पक्षाकडून चौथ्यांदा उमेदवारी देण्यात आली आहे. यापूर्वी झालेल्या २००९, २०१४ आणि २०१९ सालच्या विधानसभा निवडणुकीची आकडेवारी पाहिल्यास दर वेळेस रविंद्र चव्हाण यांच्या मतांमध्ये वाढ झाली आहे. यंदाच्या निवडणुकीतही ते विक्रमी मताधिक्क्याने विजयी होतील, असा ठाम विश्वास महायुतीच्या डोंबिवलीतील प्रमुख पदाधिकार्यांनी व्यक्त केला आहे.
( Shetkari Kamgar Paksh in Raigad Vidhansabha ) लोकसभा निवडणुकीत ‘शेतकरी कामगार पक्षा’ने महाविकास आघाडीला साथ दिली होती. रायगड आणि मावळ मतदारसंघात उमेदवार न देता शेकापने शिवसेनेच्या (ठाकरे) उमेदवारांना पाठिंबा दिला होता. “कोणत्याही परिस्थितीत शिवसेनेच्या दोन्ही उमेदवारांना चांगल्या मताधिक्याने निवडून आणू,” अशी हमी शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील यांनी दिली होती. मात्र, दोन्ही मतदारसंघांतून शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवारांचा पराभव झाला. विशेषतः रायगडमधून अनंत गीते यांचा झालेला पराभव उद्धव ठाकरे यांच्या चांगलाच जि
हरियाणा विधानसभेचा निकाल लागल्यापासून महाविकास आघाडीत प्रचंड कुरबुरी सुरू झाल्या आहेत. या निवडणुकीत काँग्रेस हरल्याची जितकी खुशी भाजपला झाली नसेल, तितकी 'उबाठा' आणि शरद पवार गटाला झाल्याचं त्यांच्या बोलण्यातून पदोपदी जाणवतंय. महाविकास आघाडीत नेमकं काय सुरू आहे? जागावाटपाची बोलणी कुठवर आली आहेत? कोणाला किती जागा सुटणार आहेत? याचा आढावा.
(Ameet Satam) भाजपचे अंधेरी (पश्चिम) येथील आमदार अमित साटम यांनी गेल्या दहा वर्षांत राबविलेल्या विकास उपक्रमांचा कार्यअहवाल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गुरुवार, दि. ११ ऑक्टोबर रोजी प्रकाशित करण्यात आला. साटम यांच्या कामगिरीच्या अहवालाचे प्रकाशन करताना फडणवीस म्हणाले की, “निवडून आलेला लोकप्रतिनिधी परिसराच्या विकासाचा चेहरा कसा बनू शकतो, याचे साटम हे एक आदर्श उदाहरण आहे. राजकारणातून जनसेवा कशी करता येते, हे त्यांनी दाखवून दिले आहे. त्यांनी दिलेली आश्वासने पूर्ण केली आहेत. त्यांना आगामी विधानस