केशवस्मृती सेवासंस्था समुहाने निरपेक्ष भावनेने मतिमंद मुलांची देखभाल करुन त्यांचा विकास करण्यासाठी सुरु केलेल्या ‘आश्रय-माझे घर’ या उपक्रमाचे कार्य उदात्त व उत्तुंग आहे. त्याद्वारे विशेष मुलामुलींच्या पालकांचे आणि सार्या समाजाचे प्रबोधन व्हावे, अशी अपेक्षा निवृत्त आय.ए.एस.अधिकारी आणि ‘डाऊन्स सिन्ड्रोम’ ग्रस्त मुलाचा सांभाळ करणारी आई अशी भूमिका बजावणार्या नीला सत्यनारायण (मुंबई) यांनी आज येथे व्यक्त केली.
Read More