‘नॅशनल स्किल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट’ (एनएसटीआय), मुंबई ही भारत सरकारच्या कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाच्या कक्षेत प्रशिक्षण महासंचालनायाद्वारे (डीजीटी) चालवल्या जाणार्या संस्थेने सोमवार, दि, 20 मार्च रोजी 60 वर्षे पूर्ण केली आहेत. यानिमित्त आयोजित कार्यक्रमात ‘एनएसटीआय’च्या उपक्रमांचा तसेच, कामगिरींवर प्रकाश टाकण्यात आला. माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडचे कार्यकारी संचालक डॉ. संतोष कुमार मल्लिक हे कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
Read More