झी मराठी वाहिनीवरील ‘खुप्ते तिथे गुप्ते’ या कार्यक्रमाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. अवधुत गुप्ते या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन करत असून आत्तापर्यंत त्यांनी अनेक कलाकार, राजकारणी यांना बोलते केले आहे. नुकताच या कार्यक्रमाचा एक प्रोमो प्रदर्शित झाला त्यात खासदार सुप्रिया सुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा फोटो पाहून भावूक झालेल्या दिसल्या. दरम्यान, आत्तापर्यंत या कार्यक्रमामध्ये आत्तापर्यंत राज ठाकरे, नारायण राणे, संजय राऊत, देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी, श्रेयस तळपदे, अमृता खानविलकर, सई ताम्हणकर, सुब
Read More
झी मराठी वाहिनीवर सध्या विशेष गाजत असलेल्या 'खुप्ते तिथे गुप्ते' या कार्यक्रमात अनेक दिग्गज मंडळी येईन नवे खुलासे करत आहेत तर कुणाची तरी पोलखोल तरी करत आहेत. आत्तापर्यंत राजकीय नेते, कलाकार अशा अनेकांनी हजेरी लावलेल्या या कार्यक्रमात केंद्रीय अमलीपदार्थ नियंत्रण विभागाच्या मुंबई विभागाचे माजी संचालक समीर वानखेडे सहभागी होणार आहेत. विशेष म्हणजे या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांनी दाऊद इब्राहिमला खुलं चॅलेंज दिलं आहे. आतापर्यंत या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रिय म
झी मराठी वाहिनीवरील खुप्ते गुप्ते या मालिकेत अभिनेते व खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी हजेरी लावली आहे. यावेळी सुत्रसंचालक अवधुत गुप्ते यांनी त्यांना डॉक्टर असल्यामुळे तुमचा एका दिवसाचा पगार आणि तुमच्या इतर डॉक्टर मित्रांचा पगार किती आहे असा प्रश्न विचारला. यावर कोल्हेंनी अतिशय हुशारीने उत्तर दिले आहे. अमोल कोल्हे यांनी केईएम मेडिकल कॉलेजमधून एमबीबीएसचं शिक्षण पूर्ण केलं. शिकतानाच त्यांनी अभिनय क्षेत्रात करिअर करण्याचा विचार केला. नंतर त्यांनी शिक्षण पूर्ण केलं, पण करिअर म्हणून अभिनयक्षेत्र निवडलं.
मुंबई : राज्यातील सध्याची राजकीय परिस्थितीत पाहता मतदारांना किंमत आहे की नाही असा प्रश्न सामान्य लोकांकडून विचारला जात असताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मतदारांनाच थेट जबाबदार धरले आहे. झी मराठी वाहिनीवरील ‘खुपते तिथे गुप्ते’ या कार्यक्रमाच्या नवीन भागात नितीन गडकरी येणार आहेत. यावेळी कार्यक्रमाचे सुत्रसंचालक अवधुत गुप्ते यांनी सद्यस्थितीतील राजकारणावर प्रश्न विचारला असता गडकरींनी मतदारांना खुपणाऱ्या गोष्टींना मतदारच जबाबदार असल्याचे म्हटले आहे.