गोदरेज प्रॉपर्टीजचे विक्री बुकिंग गेल्या आर्थिक वर्षात ८४ टक्क्यांनी वाढून विक्रमी रु. २२,५२७ कोटी झाली आहे, जी आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये रु. १२,२३२ कोटी होती. गेल्या आर्थिक वर्षातील कोणत्याही सूचीबद्ध घटकाने नोंदवलेली ही सर्वाधिक विक्री आहे. पिरोजशा म्हणाले की, विशेषत: प्रतिष्ठित ब्रँड्समध्ये गृहनिर्माण क्षेत्रात मागणी मजबूत राहील.
Read More
भारतातील विविध प्रकारच्या गृहकर्जांचा वापर नवीन घर, अपार्टमेंट किंवा जमिनीचा तुकडा खरेदी करण्यासाठी आणि जुनी मालमत्ता नूतनीकृत, विस्तारित आणि पुनर्स्थापित करण्यासाठी करणे शक्य आहे. त्यामुळे एखादे गृहकर्ज तुमचे स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी कशा प्रकारे मदत करते याबद्दल माहिती देणारा हा लेख...
आज केरळमध्ये ‘पीएफआय’सारख्या इस्लामी कट्टरपंथी संघटना पुरेशा ताकदीने सक्रिय असून, त्या विचारधारेने प्रभावित कितीतरी मुस्लीम तरुण-तरुणी ‘इसिस’मध्येही दाखल झालेल्या आहेत. तशी परिस्थिती ‘देवभूमी’ उत्तराखंडमध्ये व्हायला नको, म्हणून भूमी कायद्याच्या माध्यमातून बाहेरील, स्थलांतरित, घुसखोर मुस्लिमांच्या घर-जमीन खरेदीवर बंदीची मागणी करण्यात येत आहे.
अर्णब गोस्वामी यांनी पैसे थकवल्यामुळे आत्महत्या केलेले अन्वय नाईक आणि त्यांचे कुटुंबीय अक्षता, आज्ञा आणि रश्मी उद्धव ठाकरे, मनिषा रवींद्र वायकर यांनी रायगड जिल्ह्यातील मुरुड तालुक्यात संयुक्तरित्या जमिनीचे व्यवहार केले असल्याबाबतची कागदपत्रे उपलब्ध झाली आहेत. हे व्यवहार प्रथमदर्शनी संशयास्पद वाटत असल्यामुळे त्याची चौकशी करावी, अशी मागणी भाजपा नेते डॉ. किरीट सोमैय्या यांनी रायगडच्या जिल्हाधिकार्यांकडे केली आहे. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत डॉ.सोमैय्या यांनी ही माहिती दिली.