कर्नाटकातील मंगळुरूमध्ये एका दुकानदाराने किरकोळ कारणावरून एका कर्मचाऱ्याची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. दुकान मालक तौसीफ हुसेन याने स्वतःचाच कर्मचारी गजयान उर्फ जग्गू याच्या अंगावर पेट्रोल ओतून जिवंत जाळले. गजयान हा गेल्या ४ वर्षांपासून त्याच्या दुकानात काम करत होता. ही घटना दि. ८ जुलै रोजी मूलिहितलू परिसरात घडली. नंतर दुकानदार तौसीफ हुसेन यांने हा अपघात विद्युत शॉकमुळे झाला असे सांगण्यास सुरुवात केली, जेणेकरून कोणाला त्याच्यावर संशय येऊ नये.
Read More