सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यात वन विभागाने राबविलेली 'खवले मांजर मोहीम यशस्वी ठरताना दिसत आहे. दोडामार्ग मधील पिकुळे गावामधील एका शेतकऱ्याला मध्य रात्री दोनच्या सुमारास दुर्मिळ खवले मांजर आपल्या परसजागेत अडकला असल्याचे निदर्शनास आले. या खवले मांजराची माहिती तत्काळ वनविभागाला कळविले. वन विभागाने हे खवले मांजर ताब्यात घेतेले असून त्याची पशुवैद्यकीय तपासणी करून त्याला नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आले.
Read More