'शिख फॉर जस्टिस'चे गुरपतवंत सिंग पन्नू यांनी संसद भवनात घुसून गोंधळ घालणाऱ्या लोकांना 10 लाख रुपये देण्याची घोषणा केली आहे. 13 डिसेंबर रोजी लोकसभेचे कामकाज सुरू असताना दोन तरुणांनी सभागृहात उडी टाकून गोंधळ घातला. त्यात सहभागी असलेल्या ७ जणांपैकी ६ जणांना (विशाल-वृंदा, नीलम देवी, अमोल शिंदे, सागर शर्मा, डी मनोरंजन) पोलिसांनी अटक केली आहे. हे सहा आरोपी 4 वर्षांपासून एकमेकांना ओळखत होते आणि काही काळापासून ही घटना घडवण्याचा कट रचत होते. संसदेत हे कृत्य करण्यापूर्वी त्यांनी रेके केल्याचेही बोलले जात आहे.
Read More