नागपूर : पोलिओग्रस्त प्रणयाच्या शस्त्रक्रियेसाठी भाजपा प्रदेशाध्यक्ष श्री चंद्रशेखर बावनकुळे ( Bawankule ) यांनी मदत केल्याने दोन्ही पायांनी अपंग असणारा प्रणय आता चालू लागला आहे. त्याच्या पायाला बळ मिळाले आहे. तो भविष्यात रोजगारक्षम व्हावा यासाठी सर्वोतोपरी मदत देण्याचे वचनही श्री बावनकुळे यांनी गादा गावात भेटी दरम्यान दिले. आर्थिक परिस्थिती हलाखीची असलेल्या गडेकर कुटुंबीयांसाठी चंद्रशेखर बावनकुळे हे देवदुताप्रमाणे ठरले.
Read More
आप्पापाड्यातील दुर्घटनाग्रस्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत मिळावी यासाठी छात्रभारतीच्या वतीने ठिय्या आंदोलन करण्यात आले. याची दखल घेत विद्यापीठ प्रशासनाने मदतीचे परिपत्रक आज जारी केले आहे. आगीमुळे विद्यार्थ्यांचे सर्व शैक्षणिक साहित्य व पाठ्यपुस्तके जळून गेलीत, परीक्षेच्या तोंडावर कुठलेही स्टडी मटेरियल त्यांच्याजवळ राहिलेले नाही म्हणून छात्रभारतीच्या वतीने मागण्यांचे निवेदन मा.कुलगुरुंना देण्यात आले होते त्यावर विचार करुन आज विद्यापीठाने विद्यार्थ्यांची आयडी कार्ड फी व तत्सम सर्व शुल्क माफीचे, पुस्तकपेढीतून
राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्याविरोधात ED ने कारवाई सुरू केली आहे. मुश्रीफांच्या कोल्हापूर आणि पुण्यातील ठिकाणांवर ईडीने छापेमारी केली असून झडती सुरू आहे. या प्रकरणाचे वृत्त एएनआयने दिले आहे. मुश्रीफांच्या कागलच्या घरावर ईडीने जानेवारीत छापे टाकले होते. त्यांच्या बंगल्यावर तसेच सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखाना आणि शहरातील माजी नगराध्यक्ष प्रकाश गाडेकर यांच्याही बंगल्यावर ही धाड पडली होती. तसेच मुश्रीफांवर गडहिंग्लज साखर कारखान्यातील आर्थिक घोटाळ्याचेही आरोप आहेत.