नांदेड : नागपूरहून माहूरला पोहचण्यासाठी लहानपणी आम्हाला आठ तास लागत. आज नागपूर ते माहूर हे अंतर अवघ्या अडीच तासात पार करणे सुकर झाले आहे. माझ्या आई-वडिलांची उतरत्या वयात जी इच्छा होती ती आता पूर्णत्वास येत असल्याने मला मनस्वी आनंद होत असल्याची भावना केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केली. श्रीक्षेत्र माहूर गडावर अबाल वृद्धांसह दिव्यांग व सर्व भक्तांना सुकर ठरणाऱ्या लिफ्टसह स्कायवॉक बांधकाम योजनेच्या भूमिपूजन प्रसंगी त्यांनी आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला.
Read More