भारताचा हजारो वर्षांचा देदीप्यमान इतिहास हा गौरवाचा, अभिमानाचा विषय आहे. इथल्या दगडादगडाला इतिहास आहे. मातीचा प्रत्येक कण त्या इतिहासाचा साक्षीदार आहे. भारतात विविध काळात, विविध प्रदेशांत विविध राजवंश राज्य करून गेले. भारतीय इतिहासाकडे एकाच दृष्टीने, एकच एक प्रदेश डोळ्यांसमोर ठेवून इतिहास मांडण्याचा प्रयत्न केला, तर ती इतिहासाशी, इतिहास मांडणी शास्त्राशी प्रतारणा होईल. हाच भारताचा इतिहास म्हणून जो मांडण्यात आला आहे, पाठ्यक्रमात आहे तो असाच एकांगी आहे. इतिहास, मांडणी ही जणू काही आपली मक्तेदारी आहे, याप्रमाणे
Read More