विरोधी पक्ष माफियांना पोसतोय का? असा सवाल सध्या उपस्थित होत आहे. माफिया मुख्तार अन्सारीच्या मुलाने आपल्या वडिलांना बांदा ऐवजी भाजपचे सरकार नसलेल्या राज्यातील तुरुंगात हलवण्याचे आदेश द्यावेत, अशी विनंती सर्वोच्च न्यायालयात केली आहे. ओमर अन्सारीने आपल्या याचिकेत बांदा तुरुंगात आपल्या वडिलांचीही हत्या केली जाऊ शकते, अशी भीती व्यक्त केली आहे. उत्तर प्रदेश सरकार आपल्या संपूर्ण कुटुंबाला त्रास देत असल्याचा आरोपही उमरने केला आहे. सोमवारी (४ डिसेंबर २०२३) ही याचिका दाखल करण्यात आली.
Read More