पंजाब मेल या भारतीय रेल्वे मधील सर्वात जुन्या ट्रेनला १०९ वर्षे पूर्ण होत असून दि. १.६.२०२१ रोजी ११०व्या वर्षात प्रवेश करीत आहे. दि. २२ मार्च २०२० पासून कोविड -१९ लॉकडाऊन दरम्यान प्रवासी रेल्वेगाड्या बंद करण्यात आल्या असल्या तरी अनलॉक झाल्यावर दि. १.५.२०२० पासून या सेवा विशेष गाड्या म्हणून पुन्हा हळूहळू सुरू केल्या गेल्या. तथापि, विशेष पंजाब मेल दि. १.१२.२०२० पासून एलएचबी कोचसह सुरू करण्यात आली. एलएचबी डब्यातून प्रवाशांना अधिक सुरक्षा आणि सुखद प्रवासाचा अनुभव देतात.
Read More