(Aaple Sarkar) महाराष्ट्र शासनाच्या ४८५ सेवा ऑनलाईन उपलब्ध करुन देणारे 'आपलं सरकार' (१.०) वेब पोर्टल अधिक सक्षम, अद्ययावत करुन नव्या स्वरूपात तयार करा. त्याच बरोबर नागरिकांना जलद माहिती उपलब्ध होण्यासाठी आपलं सरकारचे 'ॲप' तयार करुन या सुविधा मोबाईलवर उपलब्ध होतील, या दृष्टीने नियोजन करा, असे निर्देश माहिती तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांनी सोमवार, दि. ६ जानेवारी रोजी विभागाला दिले.
Read More