राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक विकास कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांना मुंबई उच्च न्यायालयाने दणका दिला आहे. एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे आणि त्यांच्या कुटूंबाबद्दल कुठल्याही प्रकारचे आरोप किंवा वक्तव्य करण्यास पुढील सुनावणीपर्यंत बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे ९ डिसेंबर रोजी होणाऱ्या पुढील सुनावणीपर्यंत वक्तव्य करण्यास मलिकांना बंदी घालण्यात आली आहे.
Read More
क्रूझ पार्टी प्रकरणात आर्यन खान अटकेत आल्यापासून राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब यांनी मुंबई एनसीबी अधिकारी समीर वानखेडे, भाजप यांच्याबद्दल वक्तव्य करुन केंद्र विरुद्ध राज्य, असा या प्रकरणाला वळण देण्याचा प्रयत्न केला. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी मलिकांविरुद्ध केलेल्या पत्रकार परिषदेनंतर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मलिकांची पाठराखण केल्याची सुत्रांची माहिती आहे. बुधवारी झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत याबद्दल चर्चा झाल्याची माहिती आहे.