योग म्हटला की, साधारणतः आसनांचीच कल्पना आपल्यासमोर उभी राहते. परंतु, आसने योगाचा एक अष्टमांश भाग आहे. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, ध्यान, धारणा आणि समाधी ही योगाची अष्ट अंगे होत. आसनांमुळे शरीर निरोगी आणि दीर्घजीवी बनू शकते. शरीर अत्यंत प्राकृतिक असले म्हणजे त्याचे आधारे असणारे मनसुद्धा तितकेच प्राकृतिक म्हणजे शुद्ध अवस्थेत असू शकते. मन शुद्ध झाल्यास चित्त अवस्था आपोआप उदित होते आणि चित्त शुद्ध असल्यास ज्ञानप्राप्ती होऊन साधक आत्मज्ञानाच्या मार्गाला लागतो, असा हा मुक्तीचा सोपान आहे
Read More
सहसा योग म्हटले की, आसन आणि प्राणायाम हेच डोळ्यांसमोर येतात. योग म्हणजे व्यायाम प्रकार. योग म्हणजे वृद्धांनी करावा असा अभ्यास. योग करण्यासाठी खूप साधना लागते. खूप अध्यात्माची ओढ लागते वगैरे वगैरे. अशा अनेक मिथ्या गोष्टी योगविषयी सामान्य जनतेमध्ये प्रचलित आहेत. तेव्हा यंदाच्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या पार्श्वभूमीवर योगसप्ताहाच्या निमित्ताने दै. ‘मुंबई तरुण भारत’आणि ‘आयुर्वेद व्यासपीठ, ठाणे शाखे’तर्फे ‘युञ्जते इति योग:’ या सात भागांच्या विशेष लेखमालिकेतून विविध योग पद्धतींची तोंडओळख करून घेऊया....
भगवान गोपालकृष्णांच्या जीवनघटनांद्वारे भगवान वेदव्यास राजयोग्यांचा प्रशस्त मार्ग प्रत्येक आवश्यक अशा कर्मानुसार सांगत आहेत. कृष्णाचा जन्म मध्यरात्रीच का होतो? सर्व जग ज्यावेळेस निद्रेत असते, त्यावेळेस योगी जागृत असतो. गीता सांगते, ‘या निशा सर्व भूतानां तस्यां जागर्ति संयमी।’ अशा मध्यरात्रीच्या शांत वेळी योगी आपले चित्त एकाग्र करून विश्वशक्तीचे स्वत:मध्ये कर्षण करीत असतो. ‘कर्षति इति कृष्णः’ योग्याच्या या महान कर्षण अवस्थेलाच वेदव्यास ‘कृष्ण’ म्हणतात. ही कृष्ण अवस्था योग्यांच्या चित्तात मध्यरात्री जन्मास येत